Type to search

धुळे

वाळु ठेका रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचा ठिय्या

Share

शिंदखेडा । तालुक्यातील अमळथे येथील वाळू ठेका रद्द करावा यासाठी तापी काठावरील शेकडो ग्रामस्थांनी आज दि 19 रोजी तहसिल कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करून तहसिलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.

सदर वाळू ठेकास अमळथे, वरपाडे, नेवाडे , सोनेवाडी, अक्कडसे येथील ग्रामस्थांचा विरोध असून देखील शासनाने वाळू घाट सुरु करण्याचे आदेश दिले आहेत , वाळू घाटा विरोधात वेळोवेळी पाठपुरावा करून लेखी निवेदन देण्यात आले. मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याने या विरोधात आज दि 19 रोजी तहसिल कार्यालय शिंदखेडा येथे शेकडो ग्रामस्थांनी एक दिवशीय ठिय्या आंदोलन केले.

याप्रसंगी माजी पं. स.चे सभापती सुरेश देसले, नगरसेवक विजयसिंग गिरासे, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच तालुका वकील संघ, व्यापारी असोशिएशन रोटरी क्लब यांनी देखील पाठिंबा दिला आहे सायंंकाळीं 5 वाजता तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेतली तुमचा भावना वरीष्ठांपर्यंत पोहचवू असे ग्रामस्थांना आश्वासित केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर वाळू घाट आदेश रद्द करावा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. यावेळी मोहनसिंग गिरासे, अ‍ॅड वसंत पाटील, उपसरपंच पंडित पवार, भगवान पवार, हरेश पवार, अर्जुन पवार, मनोहर पवार, रामराव पवार, नरेंद्र पवार, किशोर पवार आंदोलनकर्ते उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!