Type to search

धुळे

एसएसव्हीपीएस महाविद्यालयास विद्यापीठाची ‘अ’ श्रेणी

Share

शिंदखेडा । येथील श्री.शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या महाविदयालयाने 71 टक्के गुण मिळवून अ श्रेणीचा दर्जा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विद्यापीठ अधिनियम 2016 नुसार राज्यातील विद्यापीठातील संलग्नीत महाविदयालयांना शैक्षणिक अंकेक्षण करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक व्यवस्थापकीय गुणवत्ता ठरविण्यासाठी व व्यवस्थापीत करण्यासाठी कुलगुरु डॉ.पी.पी. पाटील यांच्या आदेशानुसार शैक्षणिक अंकेक्षणासाठी अधिष्ठाता प्राचार्य डॉ.प्रमोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक सोयी सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, आर्थिक व्यवहार आदींची नॅक कार्यप्रणाली नुसार तपासणी करण्यात येऊन त्या आधारे अ श्रेणी महाविद्यालयास प्राप्त झाली.

विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयाचे विद्यार्थी येत आहेत. क्रीडा स्पर्धामंध्ये विद्यार्थ्यांना मिळत असलेले यश, कमवा व शिका योजनेची महाविद्यालयात प्रभावी अंमलबजावणी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारी आर्थिक मदत, महाविद्यालयात गरीब विद्यार्थ्यांसाठी राबविली जाणारी 200 विद्यार्थी दत्तक योजना, गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप, महिला मेळाव्यांचे आयोजन,

गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना मोफत जैवीक औषधीचे वाटप, गरीब व गरजू महिलांना मोफत साडया वाटप, मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन, विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि त्यात मिळालेले यश, मुलींच्या समस्या सोडविण्यासाठी महिला प्राध्यापीकेच्या अध्यक्षतेखाली समिती, जिल्हास्तरीय ज्ञानगंगा सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वृक्षांच्या रोपाचे वाटप, विविध अधिकार्‍यांचे स्पर्धापरीक्षा विषयीचे मोफत मार्गदर्शन, विविध पदांवर असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाकडून होणारा सन्मानाचा कार्यक्रम, शेतशिवार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आर.चौधरी यांनी गरीब विद्यार्थ्यांना मिळवून दिलेली 76 लाखांची शिष्यवृत्ती, त्यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून प्राप्त झालेला आदर्श शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, त्यांची नॅक संदर्भातील विविध महाविदयालयात झालेली व्याख्याने, त्यांचे विविध विषयांवरील सहा औषधींचे पेटंट नोंदणी, विदयापीठाने त्यांची केलेली विविध समित्यांवरील नेमणूक,

डॉ.एन.एस.पवार यांनी पाण्यातील बुरशींचा 8 नवीन प्रजातींचा लावलेला शोध ते जागतिक दर्जाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. तसेच महाविद्यालयातील प्रा.डॉ.संभाजी पाटील यांना मिळालेला उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार, महाविद्यालयात एम.फील, पी.एच.डी, नेट-सेट धारक प्राध्यापक, प्राध्यापकांना पी.एच.डी मार्गदर्शक म्हणून मिळालेली मान्यता, जास्तीत जास्त प्राध्यापकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र व परिषदांमधील सहभाग, आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेले संशोधीत लेख,

प्राध्यापकांची प्रकाशित झालेली पुस्तके.राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण विभाग, एनसीसी मार्फत राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम.या यशात महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी यांच्यासोबतच महाविद्यालयास नावलौकिक प्राप्त करुन देणार्‍या विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे प्राचार्य डॉ.बी.आर.चौधरी यांनी सांगितले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आ.कुणाल पाटील, उपाध्यक्ष डॉ.संजय पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रफ्फुलकुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, प्रा. सुरेश देसले, प्रमोद पाटील यांनी कौतुक केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!