Type to search

धुळे

ना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

Share

शिंदखेडा । जोगशेलु, चौगाव, सोनशेलु, हातनुर, भडणे व अलाणे या गावात विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण कार्यक्रम राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जि. प. चे गटनेते कामराज निकम, संजय गांधी निराधार योजनेचे डी. एस. गिरासे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ निकम, तहसीलदार सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे, बाजार समितीचे संचालक वाल्मिक पाटील, जोगशेलु येथील सरपंच नितीन देसले, सयाजी देसले, किरण देसले, सोनशेलु येथील सरपंच जयसिंग गिरासे, माजी सरपंच नानाभाऊ गिरासे, साळवे येथील पेडकाई ट्रस्टचे अध्यक्ष सत्तरसिंग गिरासे, सरपंच पुंडलिक फुलपगारे, उपसरपंच संतोष वाघ, विलास भारती, दिंगबर कोळी, समाधान बोरसे, हातनुर येथे भडणे येथील माजी सरपंच संजय देसले, सरपंच गिरीश देसले, अलाणे येथे माजी सरपंच भिका पाटील, नारायण गिरासे, मानसिंग गिरासे रामचंद्र कोळी आदी उपस्थित होते.

यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 2016-17 मध्ये मंजूर झालेल्या चौगाव- सोनशेलु- विखरण या 9 किमीलांबीचा साडेपाच कोटींच्या रस्त्याचे लोकार्पण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील जोगशेलु ते राज्य मार्ग 6 या 4 कोटी 90 लक्ष रु. च्या कामाचे भूमीपूजन, सोनशेलु- भडणे- हातनुर- अलाणे या 10 किमी लांबीच्या 5 कोटी 72 लक्ष रुपयेच्या रस्ताच्या कामाचे भूमीपूजन, साळवे येथील 25/15 योजनेअंतर्गत 10 लक्ष खर्चाच्या काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण तर 5 लक्ष खर्चाच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन, खासदार स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रुपयाच्या सभागृहाच्या कामाचे भूमीपूजन, जोगशेलु येथे 25/ 15 योजनेअंतर्गत 10 लक्ष रुपयाच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन, सोनशेलु येथे 10 लक्ष रुपयाच्या काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण, हातनुर येथे 25/ 15 योजनेअंतर्गत 14 लाख रुपयाच्या काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण, ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयाच्या काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण, अलाणे येथे 25/ 15 योजनेअंतर्गत 10 लक्ष रुपयाच्या काँक्रीटीकरण रस्तचे लोकार्पण, आमदार निधीतून हायमॅक्स लाईटचे लोकार्पण अशा सुमारे 16 कोटी 95 लाखांच्या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!