ज्योतीताई बोरसे यांना पुरस्कार

0
धुळे । दि.11 । प्रतिनिधी-नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील माजी सरपंच ज्योतीताई रोहिदास पाटील यांना राष्ट्रमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेतर्फे नासिक येथील परशुराम सायखेडकर नाट्य मंदिरात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ.सुधीर तांबे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी नारायण सुमंत, अंतराळ अभ्यासक तथा प्रशिक्षक (नासा) सौ. अपुर्वी जाखडी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बागूल, नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे, शिवाजीराव जोंधळे, शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रातील 14 मान्यवरांना राष्ट्रमाता जिजाऊ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी धुळे जिल्ह्यातून वर्षी येथील माजी उपसरपंच ज्योतीताई देवीदास पाटील यांचा पती देविदास पाटील यांच्यासह गौरव झाला.

 

LEAVE A REPLY

*