धुळ्यातील शिंदखेत तालुक्यातील जोगशेलूत तरुणाचा खून

ओळख अद्याप पटली नाही, अज्ञातांविरुद्ध गुन्हा

0
धुळे । शिंदखेडा तालुक्यातील जोगशेलू शिवारातील सबस्टेशन जवळ अनोळखी तरूणाचा अज्ञातांनी खून करून मृतदेह तेथे फेकुन दिल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. मृत तरूणाची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसात अज्ञात आरोपींविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोगशेलू सब स्टेशनच्या पुढे पाचशे मिटर अंतरावर आज दि. 22 रोजी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरूणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला गावातील काही लोकांना आढळून आला. ग्रामस्थांनी तत्काळ दोंडाईचा पोलिस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. अज्ञातांनी तरूणाच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्यारांनी वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

पोलिसांनी तत्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी शिंदखेडा ग्रामीण रूग्णालयात हलविला. मृत तरूणाच्या एका पायात सॉक्स आणि एक बुट आढळून आला. आज दुपारपर्यंत तरूणाची ओळख पटलेली नव्हती. याप्रकरणी पो.काँ आसाराम वाडीले यांनी दोंडाईचा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकार्‍यांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

*