Type to search

धुळे

शिंदखेड्यात एकाला पिस्तुल लावल्याने खळबळ

Share

शिंदखेडा । येथील रिधम आयकवा सेंटरवर पाण्याचे ब्यारल घेण्यास एक युवक आला. पाणी हवे असे सांगून ब्यारल भरले. तेथील मोहन माळी याने पैशाची मागणी केली मात्र पैसे देण्यास संबंधिताने नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्याने मोहन माळी याला संबंधिताने पिस्तुल लावल्याची घटना घडली.

सविस्तर माहिती अशी की, राहुल पाटील नामक युवक रिधम आयकवा सेंटरवर पाण्याचे ब्यारल घेण्यासाठी गेला असता सेंटरवरील मोहन माळी याने पैशाची मागणी केली. दोघांमध्ये वाद झाला सदर घटना संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. मोहन माळी यांच्या डोक्याला राहुल पाटील याने पिस्तूल लावताच तेथे असल्याने राहुल यास अटकाव केला. रवींद्र विनोद पाटील यांनी त्यास आवरले मात्र या घटनेचे वृत्त शहरात वार्‍यासारखे पसरले. मोहन माळी यांनी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन गाठले. याप्रसंगी नगरपंचायत उपनगराध्यक्ष भिला पाटील माळी यासह अनेक नागरिक उपस्थित झाले. पीएसआय सानप यांनी फिर्याद घेतली. मात्र पीआय नसल्यामुळे कलम लावले नाही, असे समजते. पोलीस पथक राहुल पाटीलच्या शोधार्थ गेले मात्र तो सापडला नाही. पोलीस काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे. मात्र या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली हे मात्र निश्चित.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!