धुळ्यातील साडी कारखान्यात चोरी

0
धुळे । शहरातील हाजी नगरातील सिल्क अ‍ॅण्ड फॅब्रीक्स कारखान्यात धाडसी चोरी झाली असून चोरट्याने दोन लाख 92 हजार रुपये रोख व 50 नववारी साड्या चोरुन नेल्या आहेत.

याबाबत चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील प्लॉट नं. 26 सिटीसर्व्हे नंबर 393 मधील हाजी नगरात अख्तर हुसेन अब्दुल हई यांच्या मालकीचे सिल्क अ‍ॅण्ड फॅब्रीक्स कारखाना आहे. अज्ञात चोरट्याने दि. 11 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता कारखान्यातून दोन लाख 92 हजार 500 रुपये आणि 50 नववारी साड्या असा मुद्देमाल चोरुन नेल्या.घटनास्थळाचा आढावा डीवायएसपी सचिन हिरे, पोनि के.डी.चवरे यांनी घेतला.

याबाबत चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात अख्तर हुनेस अब्दुल हई यांनी फिर्याद दिली. भादंवि 380, 427, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*