Type to search

maharashtra धुळे

सामोडे येथे कर्जबाजारीपणातून शेतकर्‍यांची आत्महत्या

Share
सामोडे । वार्ताहर- साक्री तालुक्यातील सामोडे नवागाव विठ्ठल नगरात शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल दि. 1 रोजी सकाळी घडली. त्यांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान शेतकर्‍याचे वडीलांनीही दोन वर्षापुर्वी शेतात विषप्राशन करून आत्महत्या केली होती.

दीपक गुलाब घरटे (वय 41) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. दीपकची आई दोन दिवसापूर्वीच मोठ्या भावाकडे व पत्नी महत्वाच्या कामासाठी माहेरी गेली होती. त्यामुळे घरात एकटे असतांना दिपक घरटे यांनी दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11च्या सुमारास घरात कडीला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान दीपकला शेती व्यवसायात आई व पत्नी कायमस्वरूपी मदत करीत होते.

परंतू शेती कायमस्वरूपी नापिकी असल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेला. कर्ज फेडण्यास अपयशी ठरल्यामुळे दिपकला वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवण्यास भाग पडावे लागले. दरम्यान शासकीय बँक मात्र शेतकर्‍यांना कर्जाला तगादा लावत नाही मग सावकारी कर्ज देणारे असे कोण होते, अशीही चर्चाही गावात होती.

दिपकची आई बाहेर गावाहून आली असता त्यांना दरवाजा बंद दिसला. त्यांनी हाक मारली. मात्र आतून आवाज न आल्याने जवळच्या मुलांना मागून घरात शिरण्यास सांगितले. दरवाजामधून उघडल्यावर दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे आईने मोठा आक्रोश केला. दीपकने कर्जबाजारीपणातून व त्यांच्या वडीलांनीही दोन वर्षापुर्वी कर्जामुळेच आत्महत्या केली होती, असे दिपकचे काका साहेबराव गेंडा घरटे यांनी सांगितले. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!