संभाजी ब्रिगेडतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
धुळे । दि.26 । प्रतिनिधी-संभाजी ब्रिगेड, धुळे महानगर व धुळे तालुक्याची संयुक्त बैठक मराठा सेवा संघ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी हेमंत भडक, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, तसेच चंद्रशेखर भदाणे, मिलन पाटील, शाम निरगुडे, महेश पाटील, भुषण पाटील, मनोहर आबा पाटील, विकी रवंदळ, शरद पाटील, सोनु पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत धुळे तालुका व महानगरतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी दि.15 जुलै रोजी आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.

समाजातील 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे, संपूर्ण पत्ता व फोननंबर, गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत मराठा सेवा संघाचे कार्यालय, गरुड बाग, नकाणे रोड देवपूर धुळे येथे दि.5 जुलैपर्यंत संध्याकाळी 5 ते 7 वाजेच्या दरम्यान फॉर्म भरुन जमा करावेत असे संभाजी ब्रिगेडतर्फे समाजातील पालकांना आवाहन करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी संभाजी ब्रिगेडच्या खालील पदाधिकार्‍यांकडे संपर्क साधावा. महेश पाटील धुळे तालुका, भूषण बागुल, विकी रवंदळ धुळे शहर, शाम निरगुडे धुळे शहर, मनोहर आबा पाटील धुळे शहर, सोनु पाटील धुळे शहर, प्रविण पाटील धुळे तालुका, प्रशांत पाटील धुळे तालुका असे आवाहन जिल्हाध्यक्ष हेमंत भडक यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*