Type to search

maharashtra धुळे

साक्री-सुरत रस्त्यावर कावठे फाट्यावर बस आणि लक्झरी अपघातात 10 जखमी

Share
साक्री ।राष्ट्रीय महामार्गावरील साक्री-सुरत रस्त्यावर कावठे फाट्याजवळ पहाटे 5 वाजेच्या सुमारास बस आणि लक्झरी यांच्यात समोरासमोर अपघात होऊन दोन जण गंभीर तर आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार करून गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावरून साक्रीकडून सुरतकडे एमएच 20 बीएल 2871 जालना-सुरत बस जात असतांना समोरून सुरतकडून साक्रीकडे जीजे. 14 व्ही 8877 क्रमांकाची लक्झरी बस येत असतांना कावठे फाट्याजवळ पहाटे 5 वाजेच्या सुमारास बस आणि लक्झरी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघात बस चालक भटू दगा चव्हाण रा.फागणे.आणि वाहक समाधान निळकंठ ठाकरे रा.बोरविहीर हे दोन्ही गंभीर जखमी झाले तर ललिता रमेश मराठे, रा.औरंगाबाद, प्रकाश लखीचंद पारख रा.चाळीसगाव, शकील अहमद मोहम्मद निसार रा.मालेगाव, महेबुब राजेशा लोहाणेकर रा.अवसा, जी. एम. लोहाणेकर रा. अवसा, अब्दुल रशीद रमराज रा.मालेगाव, जतीन समाधान ठाकरे रा बोरविहीर, आयशाबी शेख गुलजार रा.सुरत हे किरकोळ जखमी झाले असून जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बस चालक भटू दगा चव्हाण आणि वाहक समाधान निळकंठ ठाकरे हे दोघे गंभीर जखमी झाल्याने या दोघा जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर उर्वरित जखमींवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले.

पहाटे पाच वाजता बस व लक्झरी समोरासमोर धडकल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. अपघातग्रस्त वाहनांची पुढील बाजू पुर्णपणे चक्काचूर झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास डुमणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे,पोलीस कर्मचारी वसावे, गिरधर पाटील घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना वाहनातून बाहेर काढून जखमींना पोलीस वाहनात टाकून साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यावेळी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती. साक्री पोलीस कर्मचार्‍यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.अपघात झालेल्या लक्झरीचे चालक फरार झाला आहे. याबाबत साक्री पोलीसात मोटार अपघात दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!