Type to search

धुळे

टिटाणे फाटयाजवळ कार उलटून पाच जण जखमी

Share

साक्री । भरधाव कार उलटून पाच जण जखमी झाल्याची घटना आज दि. 22 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास टिटाणे, ता. साक्री फाटयाजवळ घडली. त्यातील दोन गंभीर जखमी झालेल्या मुलांना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शहरातील व्यापारी महिन्याच्या चौथ्या शनिवारी व्यापार, व्यवसाय बंद ठेवत असल्याने व्यापार्‍यांची मुले माल खरेदीसाठी व फिरायला बाहेर गावी जातात.

आज दुपारी चार वाजेच्या सुमारास निखील वेडू जाधव, कुणाल विक्रम पाटील, नैनेश दीपक सावंत, रोहित प्रदीप पंजाबी व अपुर्व विजय गवळी सर्व (रा. साक्री) हे एमएच 18 बीसी 3408 या कारने नंदुरबारकडे जात होते. टिटाणे फाटयाजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार उलटून पाचही जण जखमी झाले. त्यात रोहित पंजाबी व अपुर्व गवळी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर साक्री ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना धुळे येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान वेगामुळे कारने चार ते पाचवेळा पलटी झाल्याने कार चक्काचुर झाली आहे. या अपघाताची नोंद निजामपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!