Type to search

धुळे

साक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा!

Share

साक्री । साक्री शहरातील तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यावर उपाययोजना करण्यासह शहरातील विविध समस्यांही सोडवाव्यात, अशी मागणी भाजपातर्फे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

साक्री नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून आजतागायत साक्री शहरात कोणत्याही प्रकारची सुधारणा केलेली नाही. पाणी, वीज, स्वच्छता याबाबत नगरपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेहमीच उदासिनता दिसून येत आहे. साक्री शहाराच्या पिण्याच्या पाण्याबाबत सन 2015 मध्ये हंडा मोर्चा शहरवासीयांनी नगरपंचायतीवर काढला होता.पाण्यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाशी चर्चा करुन देखील नियोजन करण्यात आले नाही. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही तरतुद किंवा पाण्याचे नियोजन करण्यात आले नाही.

शहरात पाण्यासाठी विविध मोर्चे निवेदने देवूनही काहीही उपयोग झालेला दिसुन येत नाही. नगर पंचायत प्रशासनाने कुठलीही ठोस व्यवस्था केली नाही. सध्याच्या परिस्थितीत साक्री शहरातील जनता पाण्यासाठी दाही दिशा फिरत आहेत. रोजच पिण्याच्या पाण्याचे टँकर नागरिकांना 800 ते 900 रुपये दराने विकत घ्यावे लागत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तरी याबाबत दोन दिवसात नगरपंचायत प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले गेले नाही तर पुढील होणार्‍या परिणामास नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असे इशाराही देण्यात आला आहे.

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष महेंद्र देसले, राकेश दहिते, योगेश भामरे, बाबा पठाण, योगेश चौधरी आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!