Type to search

धुळे

दुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार

Share

साक्री । नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्गावर अक्कलपाडा धरणाच्या वळणावर दुचाकी आणि चार चाकीच्या वाहनामध्ये समोरा-समोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली.

दमण येथून डीएन 090 3731 क्रमांकाची कार अक्कलपाडा धरणाच्या वळणावर असतांनाच धुळ्याकडून साक्रीकडे येणारे दुचाकीची समोर-समोर धडक झाली. त्यात दुचाकीस्वार चालक भिका उर्फ भगवान दगडू सोनवणे हा तरुण जागीच ठार झाला. तर कन्हैया युवराज सोनवणे हा तरुण धुळे येथे उपचारादरम्यान मयत झाला आहे. दोघे छडवेल-पखरूण (ता.साक्री) येथील रहिवासी आहेत. छडवेल-पखरूण येथील ऊस तोडणी मजूरांचा ठेका घेणारे दगडू सोनवणे यांनी त्यांच्या मुलाला नुकतीच नवीन दुचाकी घेऊन दिली होती. धुळे येथे वाहतूक परिवहन निरीक्षक यांच्याकडे वाहन परवाना मिळण्यासाठी दोन्ही तरुण आलेे होते. परत जात असतांना हा अपघात झाला. साक्री पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!