Friday, April 26, 2024
Homeधुळेएसटीला 30 लाखांचा फटका

एसटीला 30 लाखांचा फटका

धुळे  –

कोरोना आजाराच्या भितीमुळे बस स्थानकांवर प्रवाशांची संख्या कमी दिसून आली असून प्रवाशाअभावी पुणे शहराकडे धावणार्‍या बसेस रद्द करण्यात आल्या असून यामुळे धुळे विभागाचा सुमारे 30 लाखांचा महसूल बुडणार आहे. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय जारी केले आहेत.

- Advertisement -

अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्यामुळे धुळे बसस्थानकावर आज शुकशूकाटच दिसून आला. त्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केलेला आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी अनावश्यक प्रवास करू नये, अशा सूचना दिल्या जात असल्याने अनेकांनी प्रवास रद्द केला आहे. आज धुळे बसस्थानकात प्रवासीच तुरळक प्रमाणात दिसून आले. पुणेकडे जाणार्‍या बसेस रद्द करण्यात आल्या .

धुळे आगारातून पुणेकडे जाणार्‍या बसेसच्या पाचपेक्षा जास्त फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक ते सव्वा लाख रूपयांचे फटका धुळे आगाराला बसला आहे. याशिवाय अन्य आगारातूनही पुणेकडे धावणार्‍या फेर्‍या रद्द केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या