Type to search

धुळे

बुट हाऊससह मोबाईल दुकान फोडले

Share

धुळे । शहरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच असून काल रात्री चोरट्यांनी जयहिंद चौकातील बुट हाऊस व एैंशी फुटी रस्त्यावरील मोबाईल शॉप फोडून रोख रक्कमेसह महागडे शुज व मोबाईल लंपास केले आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांसह व्यावसायीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवपूरातील जयहिंद चौकात सागर संकुलमध्ये प्रकाश चावडा यांचे दीपक लेदर नावाचे दुकान आहे. काल रात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. स्पोर्ट शुज, सॅन्डल, चप्पल असा एकुण 30 हजारांचा मुद्येमाल चोरून नेला. प्रकाश चावडा हे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी देवपूर पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच दुसरी चोरीची घटना एैंशी फुटी रस्त्यावरील लोकमान्य हॉस्पिटलजवळ घडली. वसीम शाह ताहीर शाह (रा. मोगलाई) यांचे हरिष एन्टरप्राईजेस नावाचे मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी रोख 25 हजार रूपये व 12 ते 13 मोबाईल चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याबाबत आझादनगर पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!