तापी पात्रात उडी घेवून तरुणाची आत्महत्या

0
धुळे । दि.16 । प्रतिनिधी – दभाशी, ता.शिरपूर पुलावरुन तापी नदीपात्रात उडी घेवून धुळे तालुक्यातील धनूर येथील तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत शिरपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, धुळे तालुक्यातील धनूर येथे राहणारा अमोल नारायण शिंदे (वय 22) याने दि.12 जून रोजी दुपारी चार वाजता दभाशी गावाच्या पुलावरुन तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याला उपचारासाठी शिरपूर कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉ.सुरेश वाघ यांनी तपासून मृत घोषित केले.

याबाबत वॉर्डबॉय विनोद निकम यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अपघातात ठार – वाघाडी बुद्रूक, ता.शिंदखेडा येथे राहणारा कमलेश शांताराम पाटील (वय 22) हा दि.15 जून रोजी धुळे येथे गोळ्या घेण्यासाठी मोटारसायकलीने येत असताना सरवड फाट्याजवळ शिरपूरकडून धुळ्याकडे जाणार्‍या ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिली.

यात कमलेश पाटील जखमी झाला. त्याला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ.सिध्दार्थ पाटील यांनी तपासून कमलेशला मृत घोषित केले.

याबाबत दिलीप रामदास पाटील यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*