Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

धुळ्याचे माजी पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांचा उद्या भाजपत प्रवेश

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकचे माजी पोलीस उपआयुक्त आणि धुळ्याचे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील हे उद्या भाजपत  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. या वृत्ताला त्यांच्या कुटुंबियांकडून दुजोरा मिळाला असून ते उद्या मुंबईत छोटेखानी समारंभात भाजपत दाखल होणार आहेत.

दरम्यान, ते अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांहा मतदारसंघातील राबता वाढला होता. अनेक सामाजिक कामांमध्ये त्यांनी पुढाकार घेत अनेक प्रश्न सोडवले आहेत. यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

पाटील हे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्कात होते. तसेच त्यांचा अमळनेर परिसरात जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एक सुशिक्षित उमेदवार म्हणून पाहत त्यांना अमळनेर विधानसभेचे तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे.

अमळनेर मतदार संघात बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी भाजप एकमेव पक्ष योग्य आहे म्हणून पाटील यांचा भाजपत प्रवेश होत असल्याची खात्रीशीर माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी देशदूतशी बोलताना दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!