Type to search

maharashtra धुळे फिचर्स

देशदूत रंगसारथी स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक संदेश

Share

धुळे  –

देशदूततर्फे घेण्यात येत असलेल्या रंगसारथी चित्रकला स्पर्धेतून विविध सामाजिक संदेश देण्यात येत आहे. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभत असून आज शहरातील सौ. कमलताई प्र. दलाल प्राथमिक विद्यामंदीर, कै. सौ. आनंदीबाई जावडेकर संस्कार मंदिर व मातृसेवा संघांच्या प्राथमिक शाळेत स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत चित्र रंगविले.

ही स्पर्धा देशदूतने आयोजित केली असून सहकार्यासाठी पद्मश्री बिल्डर्स, टॅलेंट पेस अ‍ॅकेडमी, पुना इलेक्ट्रॉनिक्स हाऊस, नाशिककर ज्वेलर्स हे प्रायोजक आहेत.

कमलताई विद्यामंदिर- धुळे शहरातील सौ. कमलताई प्र. दलाल प्राथमिक विद्यामंदिरात रंगसारथी स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका कल्पना मोरे, कला शिक्षिका योगिता पाटील तसेच संगिता पाटील, आशा पारधी, दिपश्री ठाकुर, पोर्णिमा पटेल, प्राजक्ता भंडारी यांनी परिश्रम घेतले.

आनंदीबाई जावडेकर संस्कार मंदिर- येथील कै. सौ. आनंदीबाई जावडेकर संस्कार मंदिरात स्पर्धेला प्रतिसाद लाभला. मुख्याध्यापक शामकांत बडगुजर, सिमा साळुंके, शोभा बडगुजर व सिमा खैरनार यांनी परिश्रम घेतले.

मातृसेवा संघ – मातृसेवा संघाच्या प्राथमिक शाळेतही विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेसाठी मुख्याध्यापक जयश्री कापडी, स्मिाता पवार, अंबिका भामरे, ललीत कुलकर्णी व प्रियंका मोराणकर यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!