पटेल शैक्षणिक संकुलातर्फे वृक्षदिंडी

0
शिरपूर । प्रतिनिधी-येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या सर्वच शाळा व महाविद्यालयांमध्ये वृक्षारोपणाची व्यापक मोहीम राबविण्यात आली.
वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडी देखील काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांच्याहस्ते अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपण, ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.

नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, गटशिक्षणाधिकारी पी.झेड.रणदिवे, बांधकाम सभापती सौ. संगिताताई देवरे, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य पी.व्ही.पाटील, मुख्याध्यापक गणेश साळुंके, मुख्याध्यापक सी.डी.पाटील उपस्थित होते.

नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल यांनी वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे पूजन केले. त्यांच्यसह गटशिक्षणाधिकारी पी.झेड रणदिवे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा साकारली होती.दिंडीत विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड व ग्रंथ पूजन, वाचन, साक्षरतेचा संदेश दिला.

विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती.वृक्षदिंडीत 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप चौधरी, गोपाल न्हावी, गजेंद्र जाधव, एस.के.भिल, जगदीश सोलंकी, अविनाश राजपूत, रमेश शिरसाठ, जे.एम.धनगर, पूनम सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*