आर.सी.पटेल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड

0
शिरपूर । प्रतिनिधी-येथिल आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या 5 विद्यार्थ्यांची कॉन्स्ट्रोविज इंटीग्रेटेड सर्विसेस प्रा.ली.नाशिक व क्यूबॅटिक इंजिनियर्स प्रा.ली. औरंगाबाद या इंजिनियरिंग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीत ट्रेनी इंजीनीयर या पदावर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.जे.बी. पाटील यांनी दिली.
कॉन्स्ट्रोविज इंटीग्रेटेड सर्विसेसतर्फे पटेल अभियांत्रिकीत पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या ईलेक्ट्रीकल व सिव्हिल शाखेतील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते.
एकूण 50 विद्यार्थी या कॅम्पस प्रक्रियेत सहभागी झाले होते. त्यात सिव्हिल शाखेतील चिंचोले शुभम अविनाश व सोनवणे मिलिंद तसेच ईलेक्ट्रीकल शाखेतील भावसार गोपाल सुरेश या 3 विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजिनीयर म्हणून वार्षिक रु.1.8 लाख या वेतनश्रेणीवर निवड करण्यात आली आहे.
तसेच क्यूबॅटिक इंजिनियर्स प्रा.ली.तर्फे पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या सिव्हिल शाखेतील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते.

एकूण 40 विद्यार्थी या कॅम्पस प्रक्रियेत सहभागी झाले होते. सदर कंपनी हि स्थापत्य क्षेत्राशी निगडीत असुन वास्तुशास्त्रीय, अभियांत्रिकी, बीआयएम, इमारत बांधकाम सहाय्य आणि सेवा देण्याचे काम करते.

त्रिस्तरीय झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला परीक्षा, टेकनिकल व शेवटी एच.आर.राउंड झाला त्यात सिव्हिल शाखेतील निलेश किशोर माळी व शेख फैजान या 2 विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजिनीयर म्हणून वार्षिक रु. 1.8 लाख या वेतनश्रेणीवर निवड करण्यात आली आहे.

कॅम्पस यशस्वीतेसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन व प्रा.राहुल जैन यांनी विशेष प्रयत्न केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक माजी कुलगुरू डॉ.के. बी.पाटील, प्राचार्य डॉ.जे.बी. पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे, मिल्केश जैन, विभाग प्रमुख प्रा.सुहास शुक्ल, प्रा.नितीन पाटील, प्रा. निलेश साळुंखे, प्रा. जी.व्ही.तपकिरे, प्रा.डी.आर.पाटील, प्रा.व्ही.एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी प्रशांत महाजन आदींनी कौतुक केले.

 

LEAVE A REPLY

*