Type to search

Breaking News धुळे

प्रहार शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन

Share

नंदुरबार  – 

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरीत मिळावी व ओला दुष्काळी जिल्हा जाहीर करावा यासह विविध मागणीसाठी आज प्रहार शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते.

प्रहार शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यंदा अतिवृष्टीमुळे हाताशी आलेले पीक वाया गेलेले आहे.

शेतकर्‍यांनी विविध प्रकारे कर्ज घेवून शेती क्षेत्रात भांडवल लावूनही शेतकर्‍यांचा घास हिरावून घेतला आहे. जिल्ह्यात कपाशी, अवकाळी पावसामुळे उमळून पडली आहे. मका, ज्वारी, बाजरी, केळी, पपई,सोयाबीन काळ्या पडलेल्या आहेत. अतिवृष्टी व ढगाळ वातावरणामुळे दृषित पाणी व चारा खराब झाल्यामुळे पशुधन शेळी, मेंढी दगावण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.

सप्टेबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे घरांची अतोनात पडझड झाली असून पंचनामे होवून देखील शासनाच्या मदतीपासून जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी व इतर नागरीक वंचित आहेत.अशा लोकांना त्वरीत भरपाई मिळणे अपेक्षित आहे.

सन 2017 च्या 2018 च्या खरीप व रब्बी पिकाचे कोरड्या दुष्काळामुळे नुकसान होवून देखील पीक विमा कंपन्याने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम पिकविमा कंपन्यांनी केले आहे. यावर्षीही अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांना पिक विम्याचा लाभ मिळणे अपेक्षित असतानाही केवळ पंचनाम्याचा खेळ व ऑनलाईन अर्ज भरण्यास शेतकर्‍यांना शेतकर्‍यांना पुन्हा अर्ज करणे किंवा पंचनाम्याचे खेळ थांबवून कुठलाही कोरड व ओलीत भेदभाव न करता येणार्‍या रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी हेक्टरी 25000 रुपये भरपाई मिळावी.

येत्या दहा दिवसाच्या आत शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम वर्ग करावी. तसेच नंदुरबार जिल्ह्याला ओला दुष्काळी जिल्हा म्हणून घोषीत करावे अशी मागणी यावेळी करण्यात आले.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील, बारकू नथ्थू शिरोळे,नंदुरबार तालुकाध्यक्ष मोहन शालीग्राम पाटील,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद दगडू पाटील, जिल्हा सरचिटणीस सावळीराम शिवाजी करे, जिल्हा सरचिटणीस गजानन सिंगा वसावे,उदयसिंग गिरासे,शशिकांत गोरख पाटील,प्रभाकर पाटील,सुदाम फुला वरसाळे , शरद देविदास साळवे ,राणूलाल जैन , माजी सरपंच, पिंपलखुटा चपाय चांद्या राऊत, दिपाल्या रुमाल्या वसावे,रामसिग इंद्या वसावे आदी अपस्थीत होते. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन उशीरापर्यंत कारवाई सुरू होती.

 

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!