महाजन, गुलाबरावांच्या ‘कुस्ती’त आ.गोटेंची उडी!

ना.पाटील सत्य तेच बोलले; आ.गोटेंकडून गुलाबरावांचे कौतूक

0
धुळे । ना.गिरीश महाजन आणि ना.गुलाबराव पाटील यांच्यात रंगलेल्या राजकीय कुस्तीच्या आखाड्यात आता आ.अनिल गोटे यांनी उडी घेतली आहे. ‘ना.महाजन हे गादीवर कुस्ती खेळणारे पहेलवान आहेत’ असे वक्तव्य करून गुलाबरावांनी बरेच काही अधोरेखीत केले आहे. ना.महाजन यांना मित्राने केलेल्या वक्तव्याचा अभिमानच वाटला असेल. ही भाषा त्यांना कमरेखालची वाटली नसेल असा उपारोधिक टोला आ.अनिल गोटे यांनी लगावला आहे.

जळगावात ना.महाजन यांनी लक्ष केल्यानंतर आ.गोटे यांनी आज पुन्हा तीन पानांचे पत्रक प्रसिध्दीला देवून ना.महाजन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ना.गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा अतिशय ‘चपखल’पणे वापर करत ‘मार्मिक’ प्रहार केले आहेत. ना.गुलाबराव पाटील यांचे कौतूक करतांना ‘लक्ष्य’मात्र ना.गिरीश महाजन यांना केले आहे.

भाजपाने नेते आ.एकनाथराव खडसे आणि ना.गुलाबराव पाटील यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रृत आहे. पण आपण एका कारणासाठी गुलाबरावांना मानतो. ते कारण म्हणजे त्यांनी कधीही नाथाभाऊंच्या विरूध्द कधीही कपटीपणे कारस्थाने व विश्वासघात केला नाही. नाथाभाऊंविरूध्दची भुमिका त्यांनी लपवूनही ठेवली नाही. नाथाभाऊ समोर दिसले की, ‘पाय धरायचे’ आणि त्यांची पाठ फिरली की उद्धट बोलायचे असा दुटप्पीपणा गुलाबराव पाटील यांनी केलेला माझ्या पाहण्यात आला नाही. ‘दिलदार के लिए दिलदार है हम, दुश्मन केले लिए तलवार है हम’ या गुलाबराव पाटील यांच्या भुमिकेचे मी कायमच कौतूक केले असल्याचे स्पष्ट करत आ.गोटे यांनी अनुल्लेखाने ना.गिरीष महाजन यांना ‘टार्गेट’ केले.

आ.महाजन यांना धुळे येथून निवडणूक लढण्याचे आव्हान आपण दिले आहे. ते स्वीकारणार नाहीत मात्र, महाजन धुळ्यात आले नाहीत तरी मी जामनेरात मुक्कामी राहून ना.महाजन यांचा पडाव करेनच असा निर्धार आ.गोटे यांनी पत्रकात व्यक्त केला आहे. असाच निर्धार आपण स्व.शिवाजीराव गिरधर पाटील यांच्या बाबतीत केला होता आणि स्व. मधुकर शिसोदे यांना माझ्या एकट्याच्या हिंमतीवर अपक्ष निवडून आणले होते याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. आपले आव्हान स्वीकारण्याची मर्दुमकी दाखवाच असे आ.गोटे यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*