Type to search

Breaking News धुळे मुख्य बातम्या राजकीय

शिवसेनेने घेतल्या ११ जणांच्या मुलाखती

Share

धुळे | निवडणुकीत युती झाली नाही तर स्वतंत्रपणे शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील चार मतदार संघात उमेदवार देण्यासाठी ११ जणांच्या मुलाखती मुंबईत घेण्यात आल्या आहेत. असे शिवसेनेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.  अद्याप विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले नाही व भाजपा-युतीची बोलणी सुरु आहे. जिल्ह्यात भाजपातर्फे स्वतंत्र मुलाखती घेण्यात आल्या आहेत

त्यानंतर दि. १७ सप्टेंबर रोजी मुंबई येथील शिवसेना भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.  धुळे शहर विधानसभा मतदार संघासाठी माजी आ. शरद पाटील, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, युवा सेनेचे ऍड. पंकज गोरे, डॉ. सुशिल महाजन, माजी महानगरप्रमुख सतिष महाले तर धुळे ग्रामीण मतदार संघातून जिल्हाप्रमुख हिलाल माळी या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

साक्री मतदार संघासाठी हिम्मत साळवे तर शिंदखेडा मतदार संघासाठी शानाभाऊ सोनवणे, हेमंत साळुंखे, छोटू पाटील, किरण पाटील यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!