Type to search

maharashtra धुळे राजकीय

दत्तू अण्णांच्या कट्टर समर्थकांचा कॉग्रेसशी

Share

कापडणे । आयुष्यभर कॉग्रेससोबत निष्ठेचे व्रत जोपासणार्‍या स्वर्गीय दत्तू अण्णांच्या परिवारातून मात्र, याच कॉग्रेसच्या विरोधात टिका-टिप्पणी होत आहे. परंतू कॉग्रेसवर टिका म्हणजे अप्रत्यक्षपणे दिवंगत आमदार द.वा. पाटील यांच्यावर टिका आहे. स्वत:ला आण्णांचे वारसदार म्हणवणार्‍यांच्या लक्षात ही गोष्ट येवू नये याचा खेद वाटतो. उभं आयुष्य कॉग्रेससोबत एकनिष्ठ असलेल्या द.वा पाटील यांचा वारसा सांगत त्यांच्या विचाराने चालणे म्हणजे कॉग्रेससोबत राहणे होय. अण्णांना मानणारा वर्ग हा, तब्बल तीन पिढ्या कॉग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या आ.कुणाल बाबा पाटील यांच्या पाठीशीच राहिल असा ठाम विश्वास स्व.दत्तूअण्णांचे नातू व दिवंगत आमदार अण्णासाहेब द.वा.पाटील स्मृती प्रतिष्ठानचे निमंत्रक राहुल जाधव यांनी एका पत्रकातून व्यक्त केला आहे.स्वत:च्या नगाव गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी हंडा मोर्चे काढत असतांना विकासाच्या नावावर मते मागत फिरणे हास्यास्पद आहे असा टोलाही श्री.जाधव यांनी पत्रकात लगावला आहे.

राजकीय व सामाजिक जीवनात वावरतांना द.वा पाटील यांनी अनेकविध पक्षांशी सख्य ठेवले. मात्र, निष्ठा कायम कॉग्रेससोबतच राहिली. कॉग्रेसविरोधात विचार मांडणे म्हणजे अण्णांच्या विचारांची प्रतारणा करणे होय. अर्थात, दत्तू अण्णांच्या धर्मपत्नी सुशिलाताई भदाणे यांना सरपंचपदाच्या निवडणुकीत विरोध करणे, त्यांच्या विरोधात पत्रकबाजी करणे, अण्णांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्या कुटुंबियांना स्थान मिळू न देणे असे कारनामे करत कुटुंबाशी प्रतारणा करणार्‍यांकडून दुसरी अपेक्षा तरी काय ठेवता येईल? असा उपरोधीक टोलाही राहुल जाधव यांनी या पत्रकात लगावला आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, 2014 मध्ये मोदी लाट असतांनाही जनतेने आपणास नाकारले, द.वा.पाटील हे आज जिवंत असते तर त्यांनीही निश्चितच आ.कुणाल पाटील यांना पाठबळ देणार्‍या भूमिकेतूनच काम केले असते. पक्षनिष्ठेचा एकच झेंडा तीन पिढ्या खांद्यावर धरणार्‍या नेत्याला पाठबळ द्यायचे की हवेनुसार आपली निष्ठा बदलणार्‍यांना? हे तालुक्यातील जनता चांगलेच जाणते. जो व्यक्ती आपल्या पक्षावर व घरातील आदर्शावर निष्ठा ठेवत नाही तो जनतेविषयी काय निष्ठा ठेवेल? असा सवालही राहूल जाधव यांनी पत्रकात केला आहे.

आजोबा दिवंगत आ. द.वा.पाटील यांनी प्रसंगी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली पण निवडल्यानंतर कॉग्रेससोबतच राहिले. राज्यात युती शासन आल्यानंतर, तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशींना द.वा.अण्णा पक्षनिष्ठेबाबत तोंडावर बोलले होते. अण्णांना भगवा फेटा बांधल्यानंतर जोशीसरांनी पक्षप्रवेशाचे सुतोवाच दिल्यानंतर अण्णांनी मी कॉग्रेस पक्षाशी इमान व निष्ठा कायम ठेवील असे म्हणत फेटा सोडला होता. त्यांनी स्वबळ व स्वकतृत्वावर निवडणूक लढविल्या. ते आज राहिले असते तर तुम्ही ज्या पक्षात आहात त्याविरोधात उभे ठाकले असते यात शंकाच नाही. ज्या कॉग्रेस पक्षाच्या विरोधात आपण राड उठवित आहात त्याच कॉग्रेस-राष्टवादीच्या कृपेने आपल्या घरातील सर्व सदस्यांनी विविध पदे उपभोगली आहेत. वारसदार म्हणवतांना निदान अण्णांच्या मृतात्म्यास त्रास होणार नाही असे वागण्याचे भान बाळगा असे आवाहनही श्री.जाधव यांनी केले आहे. आ.कुणाल पाटील यांची सामाजिक बांधिलकी, विकासकामांतून साधलेला सर्वागिण विकास व विशेषत: पक्षनिष्ठा ही उभ्या जिल्ह्यास माहित आहे. जनता आ.पाटील यांच्या व आपल्या पाठीशी किती आहे हे ही तालुक्याने गेल्या विधानसभा निवडणुकीत पाहिले आहे. आता तर लाट ओसरल्याचे चित्र आहे. द.वा.पाटील यांच्या विचारांशी आपण प्रतारणा केल्याने जनता-जनार्दनाने आपल्याला नाकारले असल्याचे शेवटी माजी आ. अण्णासाहेब द.वा. पाटील प्रतिष्ठानचे संचालक, युवा नेते राहुल जाधव यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!