पोलीस अधिकार्‍याने जुगार्‍यावर रोखली रिव्हॉल्व्हर ?

0
धुळे । दि.3 । प्रतिनिधी-जुगार अड्ड्यावर छापा टाकणार्‍या पोलिस अधिकार्‍याने जुगार्‍याच्या तोंडावर रिव्हॉल्व्हर लावली. दरम्यान या घटनेला पोलिस यंत्रणेने दुजोरा दिलेला नाही.
पोलिस पथक जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेले त्यावेळी जुगार खेळणार्‍यांना अटक करण्यात आली. त्यानंतर एका जुगार खेळणार्‍याच्या तोंडाला एका पोलिस अधिकार्‍याने रिव्हॉल्व्हर लावल्याची चर्चा आहे. परंतु या घटनेला पोलिस यंत्रणेने दुजोरा दिलेला नाही.

शहरात जुगार खुलेआमपणे खेळला जात आहे. यामुळे पोलिसांची पथके तयार करुन जुगार अड्ड्यांवर छापे टाकले जात आहे. असाच छापा काल एका पथकाने टाकला. त्यावेळी अधिकार्‍याने रिव्हॉल्व्हर लावल्याची चर्चा आहे.

 

LEAVE A REPLY

*