चार पोलिस शिपाई निलंबित

0
धुळे । दि.16 । प्रतिनिधी – येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालयात ड्युटीवर असलेले चार पोलिस शिपाई त्यांचे शस्त्र सोडून बेपत्ता झाल्याप्रकरणी चौघांना पोलिस अधिक्षक एम. रामकुमार यांनी निलंबित केले आहे.

येथील सर्वोपचार रुग्णालयात 24 तास पाहरा देण्यासाठी पोलिस दलातील चार शस्त्रधारी शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दि. 14 जून रोजी रात्री 8.30 वाजता पोलिस निरीक्षक अनिल वडनेरे हे सर्वोपचार रुग्णालयात बंदोबस्त तपासणीसाठी गेले असतांना तेथे ड्युटीवर असलेले हेकॉ भरत सूर्यवंशी, पोना राजू मोरे, कलिम शेख, पोकॉ मयुर थोरात हे जागेवर आढळून आले नाहीत मात्र त्यांची शस्त्रे ड्युटीच्या ठिकाणी आढळून आली.

याबाबत पोनि अनिल वडनेरे यांनी पोलिस अधिक्षकांना याबाबत अहवाल दिला. त्या अहवालानुसार चारही पोलिस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*