Type to search

पोलिस अधिकार्‍यासह सात कर्मचार्‍यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

maharashtra धुळे

पोलिस अधिकार्‍यासह सात कर्मचार्‍यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

Share
धुळे । जिल्हा पोलिस दलातील एका पोलिस अधिकार्‍यांसह सात कर्मचार्‍यांना पोलिस सेवेत नोकरी करीत असतांना सतत 15 वर्ष उत्तम सेवा केल्याबद्दल राज्याचे पोलिस महासंचालक यांनी सन्मानचिन्ह जाहिर केले आहे.

पोलिस निरीक्षक शिवाजी मुरलीधर बुधवंत (शिरपूर शहर पोलिस ठाणे), पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र शिवराम माळी (वाचक, एसडीपीओ कार्यालय, शिरपूर), पोलिस हवालदार नरेंद्र अशोक कुलकर्णी (स्थानिक गुन्हे शाखा, धुळे), पोलिस हवालदार संतोष भिला ओतारी (पोेलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे प्रतिनियुक्ती), पोलिस हवालदार शेखर गजानन चंद्रात्रे (नियंत्रण कक्ष, धुळे), पोलिस नाईक मोहम्मद मोबीन मो. गालीब (निजामपूर पोलिस ठाणे), पोलिस नाईक संतोष प्रकाश हिरे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे) यांना सन्मानचिन्ह जाहिर झाला आहे. या सर्वांना दि. 1 मे रोजी पोलिस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर आयोजित करण्यात येणार्‍या संचलनाच्यावेळी समारंभपुर्वक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचे पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजु भुजबळ यांनी कौतूक केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!