संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्पर्धेत मलांजन विभागात तृतीय

0
पिंपळनेर । दि.29 । वार्ताहर-साक्री तालुक्यातील मलांजन गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्पर्धेत नाशिक विभागात तिसरा क्रमांक मिळाला असून 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.
धुळे जिल्ह्यात स्मार्ट ग्राम स्पर्धेत 40 लाखांचे प्रथम बक्षिस मिळविणार्‍या मलांजन ग्रामपंचायत अव्वल ठरली आहे. नाशिक आयुक्त कार्यालयात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्पर्धेच्या निकालाची आज आयुक्त महेश झगडे यांनी घोषणा केली.

यात साक्री तालुक्यातील मलांजन ग्रामपंचायतीने नाशिक विभागातही आपला झेंडा रोवला आहे. सदर स्पर्धेत नाशिक विभागातील 11 तालुके सहभागी झाले होते.

सदर कार्यक्रमावेळी आयुक्त महेश झगडे, उपायुक्त सुकदेव बनकर, सहाय्यक आयुक्त संदीप माळुदे, मित्रगोत्री आयुक्त, जनसंपर्क विभागाचे स्वच्छता डेप्यु. सीईओ, अधिकारी उपस्थित होते.

तसेच मलांजन ग्रामपंचायतीचे सरपंच प्रा.पूनम ऋषिकेश मराठे, ग्रामसेविका आर.एस.देवरे, उपसरपंच सतीष सोनवणे, माजी सरपंच ऋषिकेश एस.देवरे, किरण मराठे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

मलांजन ग्रामपंचायतीने जनतेच्या सहभागातून स्वच्छ, सुंदर गाव निर्मितीसाठी प्रयत्न केल्याने या गावाला स्मार्ट गाव योजनेचे 40 लाखाचे व संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्पर्धेत नाशिक विभागात तिसरा क्रमांक मिळाल्याने धुळे जिल्ह्यात मलांजन ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत ठरली आहे.

स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सर्व निकष पूर्ण करुन हे यश गावाने मिळविले आहे. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिता सोनवणे, जिल्हा समन्वयक मनोज जगताप, दीपक पाटील हे उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*