पिंपळनेरला कांद्याला 2600 रुपये भाव

0
पिंपळनेर । दि.3 । वार्ताहर-पिंपळनेर कांदा मार्केटमध्ये कांद्याला 2600 रु.विक्रमी भाव मिळाला आहे.
धुळे जिल्ह्यात पिंपळनेर कांदा मार्केट प्रसिध्दीस आले असून आज दि.3 ऑगस्ट रोजी पिंपळनेर मार्केटमध्ये धुळे, नवापूर, सटाणा, साक्री तालुक्यातून विविध वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता. दु.11 वाजता लिलाव सुरु झाला.
प्रतवारीनुसार कांद्याने उसळी घेतली. कमी प्रतिचा कांदा 1000रुपये तर गोलीला 1900 रु. तर उत्तम प्रतीचा कांदा आज 2600 रुपये भावाने विकला गेला. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त करत आनंदही व्यक्त केली.

सध्या गुजरात मध्यप्रदेशासह इतर राज्यात जोरदार व सततधार पावसामुळे या राज्यातील कांदा पूर्णतः सडला असून महाराष्ट्रातही केवळ उत्तर महाराष्ट्रातच कांदा शिल्लक असल्याने आजच्या मार्केटमध्ये कांद्याने उसळी घेतली.

उमराणे, लासलगाव व 2400 पर्यंतचे भाव असतांना पिंपळनेर कांदा मार्केटमध्ये मात्र 2600 रु. प्र.क्विं. भाव मिळाला. त्यामुळे पिंपळनेर मार्केट कांदा खरेदीसाठी नावारुपाला आले आहे.

पिंपळनेरला एकच काटा वजन व रोखीने मिळारे पैसे म्हणून या मार्केटला शतकरी मोठ्या प्रमाणावर माल आणतात. काही व्यापार्‍यांचे म्हणणे 3000 रुपये भाव सुध्दा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

*