Type to search

धुळे

पिंपळनेर कांदा मार्केट सुरू होताच पाडले बंद

Share

पिंपळनेर । वार्ताहर – येथील कांदा मार्केट आज सुरू होताच संतप्त शेतकर्‍यांनी पुन्हा बंद पाडले. मार्केटच्या गैरजबाबदार व्यवहारामुळे मार्केटमध्ये लिलाल झालेल्या मालाचे पैसे मिळत नसल्याने संतप्त शेतकर्‍यांनी प्रशासनाला धारेवर धरत मार्केट बंद पाडले. शेतकर्‍यांची थट्टा करू नका, असा दमही बाजार समितीला भरला.

मार्केटमध्ये लिलाव झाल्याचे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांनी मार्केट कमिटीतच छताला फाशी घेण्याचा व अंगावर रॉकेल टाकुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.तेव्हा सदर व्यापार्‍याकडून पैसे मिळत नाही तोपर्यंत पिंपळनेर कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय मार्केट प्रशासनाने घेतला होता. बाजार समितीचे शाखा प्रमुख संजय बावा यांनी काल रात्री पत्रक काढून आज दि. 25 रोजीपासुन कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज शेतकर्‍यांनी कांदा मार्केटला विक्रीसाठी आणला. मात्र ज्या शेतकर्‍यांचे पैसे दीपक पाटील नामक व्यापारी देत नाही तरी मार्केट सुरू करण्याचा निर्णय कसा घेतला, असा प्रश्न उपस्थित करत संतप्त 30 ते 40 शेतकर्‍यांनी मार्केट कमेटीत येवून संताप व्यक्त केला. तसेच मार्केट बंद ठेवण्याचा इशारा दिला. यावेळी मार्केट प्रशासनावर राग व्यक्त करत शेतकर्‍यांनी लिलावच होवू देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्णाण झाला होता. यावेळी पैस न मिळालेले शेतकरी व कांदा विक्रीसाठी आलेले शेतकरी यात तणाव वाढू लागला होता. त्यामुळे मार्केट प्रशासनाने मार्केट केव्हा बंद, केव्हा चालु हा निर्णय घेवून शेतकर्‍यांमध्ये वाद लावण्याचा प्रकार केल्याचे बोलले जात होते.

यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी संचालक त्र्यंबक सोनवणे, गजेंद्र कोतकर यांना लिलावस्थळी बोलावून संबंधित प्रकार निदर्शनास आणुन दिला. यावेळी ज्या शेतकर्‍यांचा माल लिलावासाठी आणला गेला तेवढाच लिलाव करून पुन्हा उद्यापासुन पिंपळनेर कांदा मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!