Type to search

धुळे

चार विद्यार्थिनी ‘महाराष्ट्र भूषण’साठी पात्र

Share

पिंपळनेर | एक पत्र व्यसनमुक्तीसाठी, उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात चार विद्यार्थीनी आपल्या परिचयातील व कुटुंबातील व्यक्तींना पत्र लिहुन व्यसनमुक्त करण्यास पात्र ठरल्या आहेत. त्यांना महाराष्ट्रभूषण तर शिक्षक प्रविण मोरे यांना महाराष्ट्र रत्न या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र भुषण प्राप्त विद्यार्थीनींमध्ये सायमा शेख रईसोद्दीन (आठवी), अपूर्वा सुनील नेरकर (सहावी), वृषाली दिनेश बागुल (नववी) व सानिया शेख रियाजोद्दीन (आठवी) यांचा समावेश आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयातील व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यासाठी पत्र लिहिण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्राची साठे यांनी केले होते. त्यातर्ंगत दि. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी म्हणजेच जागतिक कर्करोग दिनानिमित्त एक पत्र व्यसनमुक्तीसाठी हा महत्वाकांक्षी उपक्रम पिंपळनेर येथील शांताई एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयात प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

एक पत्र व्यसनमुक्तीसाठी या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयातील, कुटुंबातील व्यक्तींना पत्र लिहून व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात एकूण ४ विद्यार्थिनी व्यसनमुक्त करण्यास पात्र ठरल्या. त्यात काही व्यक्तींना गुटखा, तंबाखू असे व्यसन होते.

या व्यसनातून सुटका कशी होईल, यादृष्टीने या विद्यार्थिनींनी मनापासून प्रयत्न केले. तंबाखूचे दुष्परिणाम आणि यामुळे बालवयात होणारे परिणाम, अनुकरण तसेच पुढे आपले आयुष्य कसे कवडीमोल होते आणि आजाराला कसे निमंत्रण मिळते, याची जाणीव त्यांनी आपल्या परिजनांना करून दिली. प्रसंगी विविध अटी घालून हळूहळू त्यांना व्यसनमुक्त केले.

यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपशिक्षक प्रविण मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यात शिक्षण विभाग (महाराष्ट्र शासन), सलाम मुंबई फाउंडेशन, समूहाद्वारे मार्गदर्शक शिक्षक प्रविण मोरे यांना महाराष्ट्र रत्न आणि व्यसन सोडविणार्‍या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण या सन्मानाने लवकरच गौरविण्यात येणार आहे.

तंबाखूमुक्त शाळा अभियान आणि एक पत्र व्यसनमुक्तीसाठी या उपक्रमात सहभागी होऊन व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीत आपले महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सर्वचस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष दिलीप बधान, कार्यकारी संचालक रुपेश बधान आणि विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शेखर बागुल यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतूक केले.

दरम्यान या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असे प्रविण मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!