Type to search

maharashtra धुळे

लाटीपाडा धरण कोरडे : पिंपळनेरसह पंचक्रोशीत भीषण पाणीटंचाईचे संकट

Share
सुभाष जगताप
पिंपळनेर । पिंपळनेर लाटीपाडा धरण कोरडे पडले असून पंचक्रोशीतील गावात पाणी टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. लाटीपाळा धरणात केवळ 127 दलघफू एवढाच जलसाठा उपलब्ध असून त्यात 50 दलघफू पाणी पांझरा नदीकाठी असलेल्या गावांच्या पिण्यासाठी आरक्षीत आहे हे विशेष.

पिंपळनेर पांझरा नदीवरील लाटीपाडा धरण आता कोरडे पडले असून केवळ 127 दलघफू पाण्याचा मृतसाठा उपलब्ध आहे. यापैकी पिंपळनेर गावासाठी 53 दलघफू पाणी आरक्षीत असून तेही चारी खोदून उजव्या कालव्यातून सोडण्यात येणार आहे. तर 50 दलघफू पाणी पांझरा नदी काठावरील गावांना पिण्यासाठी आरक्षीत आहे. त्यात शेणपूर, मलांजन, नवडणे, धाडणे, मालपूर कासारे, भाडणे, दातर्ती गावापर्यंत टंचाई प्रश्नी सोडण्यात यामुळे मदत होणार आहे. यानंतर 53 दलघफू पिंपळनेर शहरासाठी पुरेसे होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, आता पिंपळनेर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भविष्यात पिंपळनेर शहरालाही पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होवू शकते. जून महिन्यात पावसाळा कसा होतो आणि जुलैमध्ये भरपूर पाऊस झाला तरच पांझरेच्या पात्रात जलस्तर वाढतो. ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये उत्तम पावसाळा झाला तरच धरण भरणार आहे. पिंपळनेरकरांनी आतापासून पाणी जपून वापरले तरच टंचाईच्या भयावह परिस्थितीचा मुकाबला करता येणे शक्य होणार आहे.

भविष्यातील भीषण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच उपाययोजना करण्याची मागणी होत असून धरणाचा गाळ काढण्यासाठी युध्द पातळीवर मोहीम हाती घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष ला

गाळ काढण्याची मागणी
लाटीपाडा धरणाची क्षमता 1258 एम.से.व्ही. आहे. मात्र, धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला असल्यामुळे धरणाची क्षमता कमी झाली आहे. भविष्यात जलसाठा वाढवण्यासाठी धरणातील गाळ शासनस्तरावर काढला गेला पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत. गाळ काढला तरच जलसाठ्यात वाढ होवू शकते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!