Type to search

धुळे

सामोडेसह म्हसदी प्र. पिंपळनेर परिसरात मुसळधार पाऊस

Share

पिंपळनेर ।  वार्ताहर – येथील सामोडेसह म्हसदी ( प्र पिंपळनेर) परिसरात परिसरात आज सायंकाळी ढग फुटी सदृश परिस्थितीत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे टमाटा, मिरची, कोथंबीर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतांचे बांध फुटले, नाल्यांना पुर आल्याने शेतमजूर शेतातच अडकले.

तसेच पिंपळनेर सह परिसरातही जोरदार पाऊस झाला यात शेनपुर, मलांजन, म्हसदी प्र. पिंपळनेर शिवारात ढग फुटी सदृष्य जोरदार पाऊस झाला. पिंपळनेर, चिकसे, सामोडे, नवापाडा, जेबापूर, देशशिरवाडे, बल्हाने, शेवगे परीसरात एक तास जोरदार पाऊस झाला. या भागात पाऊसच नव्हता. आजच्या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असून शेतकरी पेरणी पुर्व कामाला लागले आहेत. बी- बियाणे, खते घेण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!