26 हजार शेतकर्‍यांनी काढला प्रधानमंत्री पीक विमा

0
धुळे । दि. 28 । प्रतिनिधी-जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत 26 हजार शेतकर्‍यांनी लागू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पिक विमा काढला आहे.
गेल्या वर्षी फळ पीक विमा योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील दोन हजार 100 शेतकर्‍यांनी फळ पिक विमा काढला आहे.
केंद्र सरकारने गेल्यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेअंतर्गत पिकाच्या विम्यासाठी शेतकर्‍यांना भराव्या लागणार्‍या हप्त्याची रक्कम कमी केल्यामुळे शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घेऊन नैसर्गिक संकटांमुळे होणार्‍या आर्थिक नुकसानी पासून बचाव करता येवूू शकतो.

या पावसाळ्यात सुरू होणार्‍या खरीप हंगामापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना यावर्षी जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे.

आतापर्यंत 26 हजार शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे. तसेच फळ पिक विमा दोन हजार 100 शेतकर्‍यांनी काढला आहे. गेल्यावर्षी 72 हजार शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता.

त्यापैकी 35 हजार शेतकर्‍यांना 20 कोटी रुपयांचा पीक विमा मिळाला आहे. तर पाच कोटी रुपयांचा फळपिक विम्याचा लाभ शेतकर्‍यांनी घेतला आहे.

त्यापैकी 35 हजार शेतकर्‍यांना 20 कोटी रुपयांचा पीक विमा मिळाला आहे. तर पाच कोटी रुपयांचा फळ पीक विम्याचा लाभ शेतकर्‍यांना देण्यात आला आहे.

गेल्यावर्षी एक हजार 200 शेतकर्‍यांना फळ पीक विमा काढला होता. यावर्षी फळ पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये एकच विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे.

हा विमा केवळ उत्पन्नातील घटक एवढ्यापुरताच मर्यादित नसून पीक काढणीनंतर पिकाचे झालेले नुकसान, तसेच चक्रीवादळे, भूस्खलन, बिगरमोसमी पाऊस संरक्षणासाठीही हा विमा उपलब्ध करण्यात येणार आहे.

पीक विमा योजना आता ऑनलाइन- खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील नऊ पिकांकरिता पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे.

ही योजना आता शेतकर्‍यांना सुलभ व सोप्या पद्धतीने विमा काढता यावा, याकरिता ऑनलाइन करण्यात आली आहे. यासाठी अर्ज व विमा हप्ता कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत.

याकरिता राज्यात सीएससीई गव्हर्नस सर्व्हिसेस इंडिया लि. द्वारे कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर्षीपासून योजनेमध्ये शेतकर्‍यांना सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव तयार करतेवेळी आधार कार्ड व फोटो असलेल्या खातेपुस्तकाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक केले आहे.

पीक निहाय विमा- संरक्षण (प्रति हेक्टरी) ज्वारी 24 हजार रुपये, बाजरी20 हजार, भुईमूग 30 हजार, मका 25 हजार, नागली 20 हजार, भात 39 हजार, सोयाबीन 40 हजार, तीळ 22 हजार, तूर 30, मुग 18 हजार, उडीद 18 हजार, कापूस 40 हजार रूपये तसेच खरीप कांदा प्रति हेक्टर 55 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
लाभासाठी अटी- शेतात पाणी साठणे, पूर येणे अशा आपत्तींना स्थानिक संकट मानण्यात येईल. प्रभावित शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करून भरपाई किंवा दावा रक्कम दिली जाईल. पीक काढण्याच्या दिवसापर्यंत जर पीक शेतातच असेल आणि त्या दरम्यान आपत्ती, वादळ, अवकाळी पाऊस आल्यास शेतकर्‍यांना दावा रक्कम मिळेल.

 

LEAVE A REPLY

*