Type to search

Featured जळगाव धुळे

…आणि पाऊस पुन्हा आला ! धुळे, पारोळा येथे जोरदार सुरूवात

Share

जळगाव –

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने हजेरी लावली असून धुळे, पारोळा येथे जोरदार सुरूवात झाली आहे.

धुळे – शहरासह परिसराला आज दुपारी अर्धा तास अवकाळी पावसाने झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरासह परिसरात आज सकाळपासून ऊन सावलीचा खेळ सुरू होता. दुपारी दोन वाजेनंतर वातावरणात बदल झाला. आकाश भरून आले. दुपारी २.१० वाजता पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीपासुन पावसाचा जोर जास्त होता. त्यात वादळही सुरू झाले.

सुमारे अर्धातास पावसाने शहराला झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारसमितीतील व्यापार्‍यांसह  फेरीवाल्याचीही तारांबळ उडाली. बाजार समितीत उघड्यावर ठेवण्यात आलेले. धान्य, कांदा व अन्य कडधान्य पाण्याखाली गेले.

यावर्षी सर्वत्र पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. अति पावसाने खरीपाचा हंगाम वाया गेला. रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची मदार असताना रब्बीची पेरणीही लांबली.

सततच्या पावसाने काही दिवसांची विश्रांती दिली, त्यात शेतीची मशागत करून रब्बीची पेरणी केली तर काही ठिकाणी अद्याप सुरू आहे. त्यातच काल संध्याकाळपासून वातावरणात अचानक बदल झाला आणि आज दि.१२ रोजी पावसाने पुन्हा हजेरी लावली. हा पाऊस रब्बी हंगामासाठी नुकसानकारक ठरणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!