पांझरा चौपाटी स्टॉलधारकांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे

0
धुळे । दि.21 । प्रतिनिधी-प्रशासनाने शहरातील पांझरा चौपाटी हटविल्यानंतर चौपाटीवरील स्टॉल धारकांनी आज जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेतली.
यावेळी आमचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे व व्यवसाय पुर्ववत सुरु राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पांझरा चौपाटी खाद्य पेय विक्रेता सेवा सहकारी संस्था या स्टॉलधारकांच्या संघटनेने निवेदनाद्वारे केली.

न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी रात्री 11 वाजेनंतर चौपाटीवरचे स्टॉल हटविण्याची कारवाई तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

रात्री स्टॉलधारकांचे साहित्य काढण्यात आल्यानंतर आज दिवसभर हे साहित्य चौपाटीवरचे साहित्य हटविण्याचे काम सुरु होते. यादरम्यान स्टॉलधारकांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली.

यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी 30-35 स्टॉलधारक उपस्थित होते. तसेच स्टॉलधारकांच्या कुटुंबियांचीदेखील यावेळी उपस्थिती होती.

आम्हाला आतापर्यंत तीनवेळा वेगवेगळ्या जागांवरुन हलविण्यात आले आहे. प्रत्येक वेळी आमचे नुकसान होत असते.स्वस्तिक टॉकीज परिसर, त्यानंतर शिवाजीरोड आणि आता पांझरा चौपाटीवरुन आमचे व्यवसाय बंद करण्यात आले.

आमचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात यावे म्हणून प्रयत्न करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सुजित बडगुजर, गणेश भिकन जाधव, प्रताप रामदास सूर्यवंशी, रफीक हसन शहा, जावेद हसन शहा, तरबेज शहा, निलेश भडांगे, दिनेश अरुण पाटील, योगेश चौधरी, नागसेन बोरसे, दिपक जाधव, विजय रंगनाथ गवळे, अभिमन्यु रमेश बच्छाव, प्रशांत मगन पवार, प्रविण राणे, सचिन जगन्नाथ कोतेकर, अन्सारी जाहील हुसेन, सुनिल गलानी, छाया विजय चौधरी, छोटू गवळी, योगेश रामचंद्र सोनार, प्रकाश महानोर, सुनिल रोहिदास चौधरी, अनिल पाटील, संदीप मराठे, प्रकाश खैरनार, किशोर चौधरी, छगन महानोर, मनोज बाळकृष्ण आवळकंठे, बापू काटकर, सुधीर शरद शिंपी, अनिस शहा, मनोहर चौधरी, कन्हैया हिरालाल परदेशी, गणेश चौधरी, नितीन बागुल, लक्ष्मीकांत प्रताप बडगुजर, शिवप्रसाद मुरलीधर डेरे, योगेश सोनवणे, मनोज आनंदराव वाणी, प्रशांत बबनलाल कोठारी, अमोल लक्ष्मण सुर्यवंशी, दत्तात्रय उखा ठाकरे, दिनेश जगदीश पाठक, भगवान जिरेकर, सचिन सूर्यवंशी, सुशिल पुनमचंद राठोड, गिता राठोड, भैय्या भदाणे, किरण थोरात, नितीन बाविस्कर, संतोष शेडगे, पंकज बाजीराव धात्रक, मोहन वाणी, सुरेश गोकुळ ढोले, सादिक पठाण, रवी मालचे, सिमा अरुण पाटील या स्टॉलधारकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*