पांझरेवरील चौपाटी काढा ! खंडपिठाचे आदेश – Photo Gallery

0
धुळे । दि.20 । वि.प्र.-आ.अनिल गोटे यांच्या स्वप्नातून पांझराच्या काठावर साकरण्यात आलेल्या चौपाटी काढण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने दिला.
चौपाटी निघणार याची खात्री झाल्यानंतर रात्री उशिरा येथील दुकानदारांनी आप-आपले बिर्‍हाड घरी घेवून जाण्यास सुरूवात केली होती. रात्री उशिरापर्यंत नेहमी गजबज असणारी ही चौपाटी ओस पडली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील तरूणांना रोजगार मिळावा, व्यवसायिकांना हक्काची जागा मिळावी आणि नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण मिळावे म्हणून आ.गोटे यांच्या संकल्पनेतून पांझरेच्या दोन्ही तिरांवर अतिशय आकर्षक चौपाटी साकरली होती.

मात्र, राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांचा या चौपाटीला विरोध होता. परिणामी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ललित वारूळे यांनी चौपाटी विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होवून निर्णय झाला.

न्यायालयाने चौपाटी अनधिकृत ठरवून ती काढण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आज वार्‍यासारखे पसरले. मात्र, अधिकृत काहीच कळत नसल्याने चौपाटीवरील व्यावसायिक संभ्रमात होते.

मात्र, रात्री उशिरा वृत्त खरे असल्याचे समजल्यानंतर संबंधीत व्यवसायिकांनी आपआपले बिर्‍हाड आवरण्यास सुरूवात केली.

धुळेकरांसाठी अप्रुप असलेली पांझरा चौपाटी रात्री उशिरा ओस पडली होती.

 

LEAVE A REPLY

*