Type to search

Breaking News धुळे

कबीरगंजमध्ये आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा

Share

धुळे – 

शहरातील प्रभाग क्र. 12 मधील कबीरगंज भागात आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. तसेच पाणीपुरवठा रात्री होत असल्याने नागरीकांचे हाल होतात. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी नगरसेविका अन्सारी फातेमा बी नुरुलअमीन यांनी केली आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील प्रभाग क्र. 12 मधील कबीरगंज भागात आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. या भागात रात्रीच पाणीपुरवठा केला जातो.

या भागातील बहुतांशी नागरिकांकडे नळ कनेक्शन नाही. त्यामुळे गल्लीत भटकंती करुन पाणी भरावे लागते. यामुळे नागरिकांचे हाल होतात. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा व किमान तीन तास पाणी देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर नगरसेविका अन्सारी फातेमा बी नुरुलअमीन, डॉ. सरफराज अन्सारी, वासीम बारी, अमीन पटेल, हाजी शब्बीर पिंजारी, एजाज शेख यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!