ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा !

0
धुळे । दि.19 । प्रतिनिधी-ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी संघटनेच्या बैठकीत करण्यात आली.
धुळ्यात दोन दिवस राज्यस्तरीय ओबीसी जनगणना परिषद घेण्यात आली. यावेळी प्रा.श्रावण देवरे, ओबीसी जनगणना परिषदेचे मुख्य आयोजक दिलीप देवरे, दलित नेते वाल्मिक दामोदर, भटक्या विमुक्त जातीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश श्रीखंडे, धीरज पाटील, पराग अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ओबीसी प्रवर्गातील विविध जाती आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. ओबीसी प्रवर्गाची प्रगती अद्याप झालेली नाही. या समाजाला दाबण्यासाठी हेतुपुरस्कर प्रयत्न केला जात आहे.

भारतीय राज्य घटनेप्रमाणे सर्व हक्क मिळण्यासाठी ओबीसी सवर्गाची स्वतंत्र जनगणना केली पाहिजे, असे बैठकीत सांगण्यात आले.

या बैठकीला नगरसेवक चंद्रकांत सोनार, लोहार समाजाचे अध्यक्ष भानुदास लोहार, मुस्लिम ओबीसी अध्यक्ष अशपाक शेख, प्रल्हाद कापडणेकर, कुंभार समाजाचे अध्यक्ष सुरेश बहाळकर, जिल्हा काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग माळी, कमलेश चौधरी, मिलींद सोनवणे, डॉ.सुरेश नंदन, विश्वासराव भामरे, महादू चौधरी, रामेश्वर चौधरी, दिनेश महाले, कृष्णा फुलपगारे, सुनीलसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*