नीट परीक्षेत हर्ष चोरडियाचे यश

0
पिंपळनेर । वार्ताहर-वैद्यकीय प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट 2017 परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून पिंपळनेर येथील हर्ष चोरडीया हा नासिक विभागात प्रथम क्रमांकांचा मानकरी ठरला आहे.
हर्ष चोरडीया हा पिंपळनेर येथील सोना गॅसचे मालक डॉ. पंकज व सौ. डॉ. प्रतिक्षा चोरडीया यांचा मुलगा आहे. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या नीट या प्रवेश चाचणी परिक्षेत देशभरातून 1431 व्या क्रमांकाने तर नासिक विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर नुकतीच घेतली गेली. देशभरातून 11 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदवली होती.

अतिमहत्वाच्या परिक्षेत पिंपळनेर ग्रामीण भागातील हर्ष पंकज चोरडीया याने नासिक विभागात सर्वप्रथम येण्याचा बहुमान व यश संपादन केले.

त्याच्या यशाचे श्रेय आई-वडीलांना देतो. त्याला प्रा.शामकांत आचार्य, प्रा. रोहित जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

त्यांच्या यशाबद्दल अ.भा.जैन समाज तालुका अध्यक्ष रीरब जैन, हभप भालचंद्र दुसाने, राजे छत्रपती इंग्लिश मेडीयमचे चेअरमन संभाजीराव आहिराव, घीसूशेठ जैन, जीवनशेठ खिवसरा यांनी शाल, श्रीफळ व पेढे भरवून स्वागत व कौतुक केले.

नियमित सराव आणि नियोजनबध्द अभ्यास केल्याने हे यश मिळाल्याचे हर्ष म्हणाला. त्यासाठी त्याने आपल्या गुरूंना आणि आईवडीलांना श्रेय दिले असून भविष्यातही यशाची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे हर्ष म्हणाला.

त्याच्या यशाचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल करावी अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. हर्ष हा नीट परिक्षा उत्तीर्ण झाल्याने त्याला पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

LEAVE A REPLY

*