Type to search

Breaking News धुळे

निसर्गमित्र समितीच्या कापडणे शाखाध्यक्षपदी विशाल शिंदे

Share

धुळे – 

निसर्गमित्र समितीच्या कापडणे शाखा अध्यक्षपदी विशाल शिंदे यांची  नियुक्ती करण्यात आली, यावेळी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करणार्‍या व्यक्तींच्या कामाची दखल घेत विशेष सन्मानही करण्यात आला.

पंचायत समिती सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यात ज्या व्यक्तींनी प्रदूषण मुक्त दिवाळी अभियान राबविले, फटाके न फोडता पर्यावरणपुरक वातावरण निर्माण केले, अशा उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रदूषण मुक्त दिवाळी करणार्‍यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास दादासाहेब शेडगे, सामाजिक वनीकरण उपसंचालीका प्राची कुलकर्णी, निसर्गमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, प्रदुषण नियंत्रण क्षेत्रअधिकारी महेश चलवा, गटशिक्षणाधिकारी पी.टी.शिंदे, निसर्गमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, प्रदेश अध्यक्ष डि.आर.पाटील, प्रदेश सचिव संतोष पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष डी.बी.पाटील, भोकरचे सरपंच मंगलदास पाटील, विश्वासराव पगार, शांताराम पाटील, प्राचार्य आर.ए.पाटील, प्रा.एच. ए. पाटील, सुकलाल बोरसे, नरेश माळी, आत्माराम सोनवणे, मनोज पाटील, संतोष एंडाईत, विशाल शिंदे, अशोक पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल शिंदे यांची निसर्ग मित्र समितीच्या कापडणे शाखाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल विशाल शिंदे यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!