Type to search

धुळे

माळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक

Share

निजामपूर । वार्ताहर- साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणेसह संपूर्ण माळमाथा परिसरात यंदा तापमानाने उच्चांक गाठला असून जनता त्रस्त झाली आहेत. त्यातच सर्वत्र तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आलेली असून या त्रासामुळे जनता घामाघूम झाली आहे. सर्वांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून मेघ गर्जना व त्यासोबत मेघ बरसणार कधी? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

यंदाचा उन्हाळा हा सर्वांच्या आठवणीत राहील, असा तप्त उन्हाळा माळमाथा परिसरात आला. त्यामुळे जनता त्रस्त झाली. शासनाने साक्री तालुक्यात प्रथम 3, नंतर 5 असे 10 पैकी 8 महसूल मंडळ हे दुष्काळी मंडळे म्हणून घोषित केले. या मंडळातील गावांना या दुष्काळाचा काही तरी लाभ मिळेल, अशी सर्वाना अपेक्षा होती. प्रामुख्याने शेतकरी वर्गासाठी काही तरी योजना येईल. याची शेतकरी वर्ग वाट पहात होता. मात्र तसे काही झाले नसल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. निजामपूर मंडळातील बहुतांशी गावामध्ये पिण्याचे पाण्याची समस्या मोठी निर्माण झाली आहे. त्यात प्रामुख्याने जैताणे गावात पाणी टंचाईने मोठ्या प्रमाणात उग्ररूप धारण केले आहे. गावात ज्या ग्रा.पंच्या कुपनलिका होत्या. त्या कुपनलिकेच्या माध्यमातून संपूर्ण जैताणे गावाला पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे जैंताणे ग्रामस्थ हे सुखी होते. पाणी पुरवठा व पाणी कर वसुली कामकाजात माळमाथा भागात नंबर एक असणार्‍या जैताणे ग्रा.पं व ग्रामस्थांना सद्यस्थितीत पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील कूपनलिकांमधून होणारा पाणीपुरवठा हा बंद झाला. त्यामुळे पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. वॉर्डा वार्डात ग्रामस्थांनी सामूहिक वर्गणी (निधी)गोळा करून कुपणालिका केल्या. आज त्या कुपनलिका मधून पाणी पुरवठा होतो आहे. मात्र काही वार्डा मध्ये आज देखील पाणी टंचाईला जनता सामोरे जात आहे. ग्रा.पं.वर महिला वर्गाचा मोर्चा धडकला होता. ग्रा.पं प्रशासन आपल्या परीने पाणीटंचाई दुर होण्यासाठी व कुपनलिका करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपसरपंच नवल खैरनार यांनी देशदूतशी बोलतांना सांगितले.

तसेच निजामपूर ग्रा.पंकडून आठवड्यातून एक दिवस (24 तास) पाणी पुरवठा हा जैताणे गावाला केला जात आहे. त्यामुळे जैताणे गावाला आधार मिळत आहे. खुडाणे गावात देखील पाणी टंचाईचे साम्राज्य निर्माण झाले होते. मात्र ग्रा.पं व ग्रामस्थांनी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर मात केली असल्याचे दिसते. गावापासून लांब अंतरावर असणार्‍या धरणाखाली विहीर खोदून तेथून पाईप लाईन टाकून पाणी गावाचे विहिरीपर्यंत आणून गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. पूर्वी प्रमाणे पाणी पुरवठा होत नसला तरी ग्रा.पं प्रशासन हे विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसते, वाजदरे या गावात देखील पाणी टंचाईला जनता सामोरे जात आहे. ग्रा.पं आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. वाजदरे गावातील ठेलारी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व किराणा दुकानदार किसन हरी ठेलारी यांनी आपल्या स्वखर्चाने कूपनलिका करून त्या कुपनलिकेला चांगले पाणी लागले. त्यामुळे कुपनलिका ही फक्त ग्रामस्थांसाठी असून त्या कुपनलिकेतून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात जातो. आज किसन ठेलारी यांनी पाणी टंचाईवर मात करून एक सामाजिक कार्याला प्राधान्य दिले असल्याने शासनाने त्यांची दखल घेणे गरजेचे आहे. मळगाव दिवाल्यामाळ या गावांमध्ये देखील पाणीटंचाई आपले उग्ररूप धारण करीत असल्याचे दिसते. निजामपूर शहराला देखील 5 ते 6 दिवसात पाणी पुरवठा होत असून पाणी नियोजन हे सरपंच सलीम पठाण यांचे मार्गदर्शनाखाली ग्रा.पं कार्यकारी मंडळ व ग्रा.पं कर्मचारी वर्ग हे अतिशय व्यवस्थितरित्या करीत आहे.

बुराई प्रकल्पावरून निजामपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. फक्त काही बिघाड झाला तरच पाणी पुरवठा उशिरा होतो. नाहीतर 5 ते 6 दिवसातून ग्रामस्थांना पाणी पुरवठा हा होत आहे. आज बुराई प्रकल्प नसता तर निजामपूर शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला असता, मात्र ती वेळ आली नाही.

माळमाथा भागात पाणीटंचाई उग्ररूप धारण करीत असून जनता त्रास सहन करीत आहे. तप्त उन्हाने जनता घामाघूम होत आहे. रात्री, पहाटे विज पुरवठा खंडीत होत आहे. पाच रुपयात पिण्याचे पाणी ड्रम भरून मिळते. मात्र कुलरसाठी पाणीसाठा करावा लागतो. आता सर्वांना पावसाचे वेध लागले आहेत. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. त्यामुळे येरे घना, येरे घना, पाऊस पाड माझे अंगणा वरूण राजा बरसला की सर्वच चिंता दूर होतील, असे सर्वच जण म्हणू लागले आहेत.

भाविकांनाही पाणी मिळेना…!
गोकुळ माता देवस्थान, म्हसाई माता देवस्थान या तीर्थ क्षेत्र ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भाविकांना पिण्याचे पाणी नाही तसेच झाडांना पाणी नसल्याने त्यांची परिस्थिती खूपच खराब झाली असल्याचे म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, उपाध्यक्ष भिकनलाल जयस्वाल यानी देशदूतशी बोलतांना नमूद केले. 14 जून आला तरी देखील अद्याप पाऊस बरसला नाही. आकाशात काळे ढग येतात पण बरसत नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!