Type to search

maharashtra धुळे

अपघातात आई ठार, मुलगा जखमी

Share
निजामपूर । वार्ताहर- भरधाव आयशर वाहनाने पुढे चालणार्‍या दुचाकीला कट मारल्याने दुचाकी रस्त्यावर घसरून आयशरच्या चाकाखाली येवून महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा जखमी झाला. ही घटना काल दि. 17 रोजी सकाळी निजामपूरजवळील शिवाजीनगर भागातील गोकूळनाला परिसरात घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिसात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भैय्या मनराज पाटील (रा. टिटाणे ता. साक्री) हे त्यांच्या आई येडबाई मनराज पाटील यांच्या सोबत दुचाकीने (क्र. एमएच 39/ एम 9359) साक्रीहून टिटाणे येथे घरी जात होते. त्यादरम्यान निजामपूरपासून चार किलोमीटर अंतरावर गोकूळ नाल्याजवळ मागून येणार्‍या आयशर गाडीने (क्र. एमएच 18 एसी 2254) दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर घसरून येडबाई मनराज पाटील या खाली पडल्या.

आयशरचे मागचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर भैय्या पाटील हा जखमी झाला. त्यांना जैताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून येडबाई पाटील यांना मृत घोषित केले. याप्रकरणी भैय्या पाटील यांच्या फिर्यादीवरुन आयशर चालक हरिभाऊ गोविंद हजारे (रा.सोन्या मारुती मंदिराजवळ, धुळे) याच्याविरुध्द भादंवि कलम 304(अ) 279, 337, 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयशर गाडी निजामपूर पोलिसात जमा करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!