Type to search

धुळे

आदिवासी वस्तीत रस्ता कॉक्रीटीकरणासाठी तीन कोटी मंजूर

Share

धुळे । आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी एकात्मिक प्रकल्प विभागाकडून शिरपुर तालुक्यातील आदिवासी लोकवस्तीमध्ये रस्ता कॉक्रीटीकरणसाठी 295.55 लाख रुपये मंजूर झाले असून भाजपाचे डॉ. जितेंद्र ठाकुर यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे.

शिरपूर तालुक्यातील आदिवासी लोकवस्तींमध्ये रस्त्यांची फारच दूरावस्था झाल्याने ते कायम स्वरूपी पक्के करण्याची मागणी डॉ.जितेंद्र ठाकुर यांच्याकडे आदिवासींनी केली होती. त्यानंतर डॉ. जितेंद्र ठाकुर यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा, रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे शिरपुर तालुक्यासाठी अधिकाधिक कामे मंजूर करण्याची मागणी केली. यानंतर आदिवासी प्रकल्पाकडून 295.55 लाख रुपये रस्ता कॉक्रीटीकरणसाठी मंजूर करण्यात आले.

शिंगावे येथे 15 लाख, जामन्यापाडा येथे 10 लाख, करवंद येथे 10 लाख, गधडदेव येथे 10 लाख, रामपूरा 6 लाख, रोषमाळ 6 लाख, अजनाड 7 लाख, फत्तेपुर फॉ.14.99 लाख, आसरापाणी 9 लाख, भोईटी 20 लाख, आंबे 9 लाख, जोयदा 10 लाख, निंबारी 9 लाख, झेंडेअंजन 10 लाख, बुडकी विहीर 7 लाख, वाकपाडा 7 लाख, मांजरबर्डी 6 लाख, सजगर पाडा 10 लाख, हिंगाव 10 लाख, खारीखान 10 लाख, नवागाव 10 लाख, चिंचपाणी 10 लाख, रोहिणी 10 लाख, बोराडी 24.99 लाख, वाडी बु. 14.99 लाख, वाडी खु. 14.99 लाख, टेंभेपाडा 14.99 लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच कामांना सुरूवात होणार आहे.

या कामांच्या मंजुरीसाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खा.हिनाताई गावित, आदिवासी प्रकल्प अधिकारी श्री.हळपे, आदिवासी प्रकल्प समिती सदस्या डॉ. सौ.शीतल ठाकुर, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, दीपक जमादार, यांसह आदिवासी आघाडीचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

डॉ.जितेंद्र ठाकुर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आदिवासी वस्त्यांमध्ये रस्ते कॉक्रीटीकरण होऊन मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांना त्याचा फायदा होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!