Type to search

धुळे

शिंदखेडा मतदारसंघात जल्लोष

Share

दोंडाईचा । धुळे लोकसभा मतदारसंघात डॉ. सुभाष भामरे यांच्या दणदणीत विजयानंतर राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर ठुमका धरत विजय आनंदोत्सव साजरा केला. निकालात शिंदखेडा मतदारसंघात जवळपास 55 हजार मतांची जोरदार आघाडी देखील मिळाली आहे.

विजयी झाल्याच्या वृत्तानंतर ना. जयकुमार रावल यांनी धुळे येथे जाऊन डॉ. सुभाष भामरे यांच्या समवेत देखील आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर दोंडाईचा येथे आल्यावर रावल गढी वर कार्यकर्ते समवेत डीजेच्या तालावर ठुमका धरला, यावेळी सर्व नगरसेवक, सभापती भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाय दोंडाईचा शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!