Type to search

राष्ट्रसेविका समिती शिबिरातून सामाजिक दायित्वाची जाणीव- माधुरी बोरसे

maharashtra धुळे

राष्ट्रसेविका समिती शिबिरातून सामाजिक दायित्वाची जाणीव- माधुरी बोरसे

Share
धुळे । राष्ट्र सेविका समितीच्या शिबिरातून मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन शिबिरार्थींच्या आयुष्याला दिशा देणारेच होते. शिबिरातून जी शिकवण मिळाली. त्यातून सामाजिक दायित्व काय असते आणि ते कसे निभावले पाहिजे, याची शाश्वत माहिती शिबिरार्थींना मिळाली आहे. अशा पध्दतीची माहिती मिळणे महत्वाचे असते. या पुढील काळात राष्ट्र सेविका समितीने माझ्यावर जबाबदारी सोपविली तर, ती पार पाडण्यात मला निश्चितच समाधान मिळेल, अशी भावना डॉ. माधुरी बोरसे-बाफना यांनी व्यक्त केली. डॉ. बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्र सेविका समितीच्या निवासी शिबिराचा शुक्रवारी समारोप झाला.

राष्ट्र सेविका समितीच्या धुळे शाखेच्या पुढाकाराने देवगिरी प्रांतातील जिल्ह्यांसाठी 15 दिवसांचे निवासी शिबिर जो. रा. सिटी विद्यालयात झाले. या शिबिरास देवगिरी प्रांतातील बहुसंख्य तरूणी आणि महिला सहभागी झाल्या होत्या. शिबिराचा समारोप शुक्रवारी सायंकाळी झाला. यावेळी डॉ. माधुरी बोरसे-बाफना यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय राष्ट्र सेविका समितीच्या सहकार्यवाह चित्रा जोशी, संघमित्रा कापडी, मालती राठोड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी शिबिरार्थी तरूणींनी शारीरिक कवायती बरोबरच लाठी-काठी, ज्युदो, कराटे याबाबतची प्रात्यक्षिके दाखविली. प्रात्यक्षिके पाहताना उपस्थित मान्यवरांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यामुळे शिबिरार्थीं तरूणींचा उत्साह दुणावला.

यावेळी बोलतांना डॉ. माधुरी बोरसे-बाफना म्हणाल्या की, आजच्या काळात सामाजिक जीवन जगतांना आपले दायित्व काय, हे अनेकांना समजत नाही. परंतु, राष्ट्रसेविका समितीच्या या शिबिरातुन सामाजिक दायित्व आणि नितीमुल्यांविषयी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शिबिरार्थीना मिळालेले मार्गदर्शन हे त्यांच्या आयुष्याला निश्चितच चांगली दिशा देईल. या शिबिरातुन संस्कार, संस्कृती, राष्ट्रप्रेमाचे शाश्वत धडे तरुणींना मिळाले. त्यामुळे सामाजिक जिवन जगतांना या तरुणी राष्ट्राभिमान जोपासतील. शिबिरातील अनुभव त्यांचे आयुष्य समृध्द करतील यात शंका नाही. यापुढील काळात राष्ट्रसेविका समितीने माझ्यावर काही जबाबदारी सोपविली तर ती पार पाडतांना मला आनंद वाटेल, असे ही डॉ.माधुरी बोरसे म्हणाल्या.

राष्ट्रसेविका समितीच्या सहकार्यवाह चित्रा जोशी म्हणाल्या, सर्व मिळुन आपण जे काही काम करतो ते व्यक्तीगत नसते. सर्वप्रथम राष्ट्रासाठी काम केले पाहिजे. त्यानंतर स्वत:साठीकाम करायला हवे अशी शिकवणच राष्ट्रसेविका समितीची आहे. त्यामुळेच या वर्षी पहिल्या प्रशिक्षण वर्गाचे नामकरण, बलसागर भारत होवो असे ठेवले. भारतात अनेक संत महात्म्ये होवुन गेले. त्यांची शिकवण आणि कामे मोलाची आहे. संत महात्म्यांच्या शिकवणीतुन प्रत्येक समाजाला देशाप्रती आणि माणसाला समाजाप्रती आदर आणि दायित्व असावे, अशी शिकवण दिली आहे. संपुर्ण जगाला शांततेचा आणि प्रेमाचा संदेश देणारे भारत हे एकमेव राष्ट्र आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयावर जास्तीची जबाबदारी आहे. शहरातील जो. रा. सिटी विद्यालयाच्या मैदानावर निवासी शिबिराचा समारोप झाला. सायंकाळी परस्परांची गळाभेट घेऊन शिबिरार्थी तरुणी घरी परतल्या. निला कुलकर्णी, निला रानडे यांनी शिबिराचे संयोजन केले.

शिबिरार्थींनी केले अनुभव कथन
शिबिराच्या समारोपप्रसंगी शिबिरार्थी तरुणींनी अनुभव कथन करीत समाधान व्यक्त केले. काही तरुणींनी पौराणिक गोष्टींना उजाळा देत येणार्‍या काळात समाजाविषयी आपले दायित्व कसे असेल आणि ते कसे पार पाडता येईल याबाबत कथन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!