Type to search

धुळे

धुळ्यात 70 लाखांच्या प्रवेशद्वाराला स्थायीची मंजुरी

Share

धुळे । शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे मोठ्या पुलावर 70 लाख रूपये खर्चुन प्रवेशव्दार उभाण्याच्या कामास स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. दरम्यान शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे.ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यासह इतर समस्या आहेत. त्यामुळे प्रवेशव्दार उभारण्यापेक्षा इतर कामे करावी, अशी सुचना करत नगरसेवक संतोष खताळ यांनी या विषयाला विरोध दर्शविला. सभेत एकुण तीन विषयांना मंजुरी देण्यात आली. तर दोन विषय तहकुब ठेवण्यात आले.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आज सभापती युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सहाय्यक आयुक्त शांतराम गोसावी, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ तसेच नगरसेवक नागसेन बोरसे, संतोष भिल,  मनोज जगताप, कशीर उदासी, संतोष खताळ, अमिन पटेल आदी उपस्थित होते. सभेत एकुण पाच विषयांवर चर्चा करण्यात आली.

हद्दवाढीकडे दुर्लक्ष होत आहे. हातपंपांची दुरूस्ती झालेली नाही. लिकेज दुरूस्ती केल्याचे  फोटा काढून सदस्यांना माहिती द्यावी, चित्तोड रोडवरील खड्डे बुजविले जात नाही. मुरूम टाकला जात नाही. प्रवेशव्दारापेक्षा विकास कामांवर  खर्च करावा, खड्डे दुरूस्तीसाठीही तरतुद करावी, अशा सुचना सभेत नगसेवक संजय भिल, अमिन पटेल, संतोष खताळ, नागसेन बोरसे यांनी केल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!