Type to search

धुळे

वजनकाटा बंद झाल्याने वरखेडी रोडवर घंटागाड्यांच्या रांगा

Share

धुळे । शहरातील वरखेडी रोडवर असलेल्या महापालिकेच्या कचरा संकलन केंद्रावरील वीज पुरवठा भारनियमनामुळे आज बंद झाला. त्यामुळे येथील वजन काटा देखील बंद झाल्याने याठिकाणी एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत कचरा संकलन करणार्‍या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या घंटागाड्यांमुळे वरखेडी रोडवरील वाहतूक सुमारे दोन तास खोळंबली होती. कचरा संकलन केंद्रातील रोजच्या समस्यांचा परिणाम येथील शेती क्षेत्रावर देखील होत आहे. कचरा संकलन केंद्रातील समस्यांबाबत, येथील दुर्गंधीबाबत परिसरातील शेतकर्‍यांनी महापालिकेच्या प्रशासनाला वेळोवेळी लिखित, तोंडी स्वरूपात अवगत करून देखील परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने शेतकरी कोणत्याही क्षणी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा वरखेडी येथील शेतकर्‍यांनी दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!