Type to search

maharashtra धुळे मुख्य बातम्या

धुळे जिल्ह्यातील प्रकल्पात केवळ 9.33 टक्केच जलसाठा

Share
धुळे । जिल्ह्यात दुष्काळाच्या छळा दिवसेंदिवस तिव्र होत आहेत. त्यात जिल्ह्यातील 13 मध्यम व एक लघू प्रकल्पामध्ये केवळ 9.33 टक्केच उपयुक्त साठा शिल्लक आहे. त्यातही पाच मध्यम प्रकल्पांमध्ये पाण्यावाचून ठणठणाट आहे. पावसाळा सुरु होण्यास अद्यापही 15 ते 20 दिवसांचा अवकाश आहे. त्यामुळे सर्वांनाच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपुन वापर करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. पावसाअभावी पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. मार्च महिन्यातच अनेक लहान मोठे जलसाठे कोरडे झाले होते. तर विहिरी, कूपनलिकांसह पाण्याचे सर्वच स्त्रोत आता आटले आहेत. नागरिकांसह जनावरांची देखील पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे. जनावरांचेदेखील पाणी नसल्यामुळे हाल सुरु आहेत. त्याचा चार्‍याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. जिल्ह्यातील 13 मध्यम प्रकल्प आणि एक लघू प्रकल्पामधला पाणीसाठा कमी झाला आहे.

यापैकी पाच प्रकल्पात पाण्यावाचून ठणठणाट आहे. यात कनोली, सोनवद, अमरावती, अक्कलपाडा, वाडीशेवाडी या मध्यमप्रकल्पात आता जलसाठाच शिल्लक राहिलेला नाही. हे पाचही प्रकल्प यंदाच्या दुष्काळात कोरडे झाले आहेत. तसेच बुराई आणि मालनगाव मध्यम प्रकल्पात एक टक्क्यापेक्षादेखील कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिकच जाणवत आहे. त्यात पावसाळा सुरू होण्यास अजुन 15 ते 20 दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे आहे ते पाणी जपुन वापरण्याची गरज आहे.

मध्यम प्रकल्पातील जलसाठा कंसात टक्केवारी- पांझरा 3.61 (10.13),
मालनगाव 0.11 (0.99), जामखेडी 2.14 (17.34), कनोली 0.00 (0.00), बुराई 0.09 (0.65), करवंद 1.31 (7.17), अनेर 14.02 (28.46), सोनवद 0.00 (0.00), अमरावती 0.00 (0.00), अक्कलपाडा 0.00 (0.00), वाडीशेवाडी 0.00 (0.00), सुलवाडे 19.93 (30.63) तसेच लघुप्रकल्पातील जलसाठा- ल.पा.मुकटी 2.23 (21.88) एकूण 46.17 (9.33) जलसाठा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!