Type to search

maharashtra

तीव्र दुष्काळाचा बांधकाम मजुरांना फटका

Share
तर्‍हाडी । वार्ताहर- शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडीसह वरूळ, भटाणे, जवखेडे, तर्‍हाड परिसरात पाणीटंचाईच्या झळांनी आता बांधकाम क्षेत्रही होरपळू लागले आहे. अनेक लहान-मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी आपली कामे पाण्याअभावी थांबविल्यामुळे त्यांच्याकडील बांधकाम मजुरांवर उपाशी राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे अनेक मजुरांची दुसर्‍या क्षेत्रात काम शोधण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

परिसरातील ज्या बांधकाम व्यावसायिकांचे बांधकाम पाण्यावर अवलंबून होते, त्यांना पाणीटंचाईमुळे आपली बांधाकामे तात्पुरती स्थगीत करावी लागली आहेत. परिणामी या पाणीटंचाईचा फटका बांधकाम व्यावसायिकांपेक्षा अधिक बांधकाम मजुरांना बसला आहे. बांधकाम बंद ठेवण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढू लागल्याने बांधकाम मजुरांना रोजगार मिळत नसल्याचे चित्र आहे. कित्येक अकुशल बांधकाम मजुरांवर इतर क्षेत्रात काम शोधण्याची वेळ आली आहे. यात शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडी, वरूळ ,भटाणे, जवखेडा, तर्‍हाडसह परिसरात मजुरांची संख्या अधिक आहे. मात्र ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे बांधकामासाठी आवश्यक पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे, त्यांच्याकडील मजुरांचा रोजगार टिकून असल्याचे चित्र आहे.

ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे स्वतःचा पाण्याचा स्त्रोत नाही त्यांना पुरविण्यात येणार्‍या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. परंतु पाणीटंचाईमुळे बांधकाम क्षेत्रासाठी पाणी देण्यावर काही काळासाठी बंधने घातल्याने, या बांधकाम व्यावसायिकांपुढे आपली कामे काही दिवसांसाठी बंद ठेवण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. यामुळे या क्षेत्रावर अवलंबून असणार्‍या मजुरावर या तीव्र दुष्काळ परिस्थितीमुळे उपासमारीची वेळ आली आहे.

प्रशासनाकडून मजुरांकडे दुर्लक्ष
तीव्र दुष्काळ परिस्थितीचा फटका बांधकाम व्यवसायिकांना असल्याकारणाने जगण्याचा संपूर्ण आधार असलेला हा व्यवसाय कोलमडल्याने मजूर कामाअभावी हतबल झाले आहेत. दररोज चा उदरनिर्वाह करण्यासाठी या मजुरांना काम शोधण्याचा संघर्ष करावा लागत असताना प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने याची अधिक तीव्र झळ मजुरांना सहन करावी लागत आहे.

ऊसतोड मजुरानंतर बांधकाम मजुरांची सर्वाधिक आकडेवारी
शिरपुर हा तालुक्यात अद्याप पर्यंत ऊसतोड मजुरांचा तालुका म्हणूनच ओळखला जात असून या ऊसतोड मजुरांच्या उसतोडनंतर तालुक्यात तर्‍हाडी, वरूळ, भटाणे, जवखेडा, तर्‍हाडसह सर्वाधिक मजूर हे बांधकाम व्यवसायावर कार्यरत असल्याचे बांधकाम व्यवसायीकाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाने या दुष्काळी परिस्थितीत बेरोजगार झालेल्या मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!